शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लक्षणेच नसलेल्या कॅन्सरचे होणार रक्तचाचणीद्वारे निदान; 'गॅलरी टेस्ट' हे नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2022 08:41 IST

५० वर्षे वयावरील सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी, रक्त चाचणीद्वारे बिगरलक्षण कर्करोगाचे निदान होते हे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने एक घोषणा केली आहे.

लंडन : कर्करोगाचे काही प्रकार असे आहेत की, त्यांची कोणतीही लक्षणे आढळून येत नाहीत. अशा बिगरलक्षण कर्करोगाचे आता रक्ताच्या चाचणीद्वारे निदान करणे शक्य होणार आहे. त्या चाचणीला गॅलरी टेस्ट असे नाव देण्यात आले आहे. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या संशोधनासाठी ५० वर्षे वयावरील सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

जगभरातील नवे संशोधन, तंत्रज्ञान यांच्याबाबत पाथफाईंडर ही कंपनी अद्ययावत माहिती देत असते. पाथफाईंडरने म्हटले आहे की, बिगरलक्षण कर्करोगाचे निदान करण्यासाठी रक्त चाचणी किती उपयोगी आहे याची सहा हजार जणांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यातील काही जणांच्या कर्करोगाचे निदान रक्त चाचणीद्वारे करण्यात आले. त्या व्यक्तींना कर्करोग झाल्याची कोणतीही लक्षणे नव्हती. 

रक्त चाचणीद्वारे बिगरलक्षण कर्करोगाचे निदान होते हे लक्षात आल्यानंतर ब्रिटनने एक घोषणा केली आहे. पुढील वर्षी १.६ लाख नागरिकांची अशी रक्तचाचणी करण्याचे ब्रिटनने ठरविले आहे. या चाचणीमुळे रोगाचे निदान त्वरित होऊन उपचारांचा वेगही वाढविता येईल असे ब्रिटनने म्हटले आहे. 

एका महिलेला दोन प्रकारचे कर्करोगकाही रुग्णांमध्ये ट्यूमर आढळले. त्यापैकी १४ रुग्णांच्या शरीरातील प्राथमिक अवस्थेत होते. त्यातील एका महिलेला दोन प्रकारचे कर्करोग झाल्याचे निदर्शनास आले.  या सर्व रुग्णांनी पुढील काळात नियमित वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असा सल्ला डॉक्टरांनी त्यांना दिला. ही माहिती बिगरलक्षण कर्करोगाचे निदान रक्त चाचणीव्दारे करण्याच्या संशोधन पथकातील एक शास्त्रज्ञ फॅब्रिस आंद्रे यांनी दिली.

टॅग्स :cancerकर्करोग