शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
4
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
5
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
6
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
7
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
8
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
9
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
10
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
11
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
12
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
13
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
14
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
15
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
16
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
17
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
18
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
19
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
20
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'

गरोदर आहात? मोबाईलचा वापर कमी करा, अन्यथा..

By admin | Updated: May 18, 2017 14:52 IST

ज्या गरोदर माता मोबाईलचा अती वापर करतात त्यांची मूलं हायपर होण्याचा धोका?

- नेहा चढ्ढाज्या गरोदर माता मोबाईलचा कमीत कमी वापर करतात त्यांच्या तुलनेत सतत मोबाईललाच चिकटलेल्या गरोदर मातांची मूलं जास्त हायपर अ‍ॅक्टिव्ह असतात असा एक अभ्यास नुकताच समोर आला आहे. मोबाईलमधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मूलं हायपर अ‍ॅक्टिव्ह होवू शकतात असं एक निरीक्षण समोर येतं आहे. प्रख्यात लेखिका लॉरा बिर्क्स यांनी आणि त्यांच्या टीमने विश्लेषण केलेल्या आकडेवारीनुसार मोबाईलचा अती वापर करणाऱ्या मातांची मूलं हायपर अ‍ॅक्टिव्ह असलेली आढळलेली आहेत.बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोब हेल्थ यांच्यावतीने लॉरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८० हजार मातांचं एक सर्व्हेक्षण केलं. डेन्मार्क, स्पेन, नॉर्वे, नेदरलॅण्डस आणि कोरिया या देशातल्या मातांचा आणि मुलांचा हा अभ्यास. त्यात त्यांना असं आढळलं की गरोदरपणात ज्या माता मोबाइलवर जास्त वेळ बोलत होत्या त्या मातांच्या मुलांना आता वर्तन समस्या अधिक आहेत. नुस्त्या वर्तन समस्याच नाही तर भावनिक समस्याही अधिक दिसून आल्याचे हा अभ्यास म्हणतो.

१९९६ ते २०११ दरम्यान गरोदर  असलेल्या  मातांचं  आणि  त्यांच्या  मुलांचं  दरम्यान हे सर्व्हेक्षण झालं. ज्या मातांनी मोबाईल वापरलाच नाही किंवा अगदी कमी वापरला त्यांची मुलं तुलनेनं शांत आणि भावनिक दृष्ट्याही स्थिर होती. मात्र ज्या माता मोबाईलवर अधिक बोलत त्यांची मुलं जास्त अस्वस्थ, तडतडी, आणि चिडचिडी दिसली. 

आता याचा मोबाईल वापराशीच थेट संंबंध असेल का ? तर त्याचा एक संबंध म्हणजे त्यातून पालक म्हणून तुमचा स्वभाव कळतो. तुम्ही कशाला महत्व देता हे कळतं. तुमचा पोटातल्या बाळाशी संवाद किती हे कळतं. आणि मूल झाल्यानंतरही पालक म्हणून वर्तन, मुलांकडे लक्ष यासाऱ्याशी त्याचा संबंध आहे. गरोदर मातांनी मोबाईल वापरुच नये असा या अभ्यासाचा सल्ला नाही मात्र, मूलावर त्याचा परिणाम होतो याकडे हा अभ्यास लक्ष वेधतो आहे.