शहरं
Join us  
Trending Stories
1
"सकाळी उठा, व्होटर डेलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
2
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
3
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
4
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
5
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी
6
"काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान
7
तीन सख्ख्या बहिणींवर नातेवाईकच २०२० पासून करत होता बलात्कार; अहिल्यानगरमधील संतापजनक घटना
8
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीला 'खासदारकी'मुळे आव्हान, न्यायालयाने काय दिला निकाल?
9
स्कँडल, कर्ज आणि घसरते शेअर्स... जगातील सर्वात मोठ्या फूड कंपनीला वाचवू शकतील का नवे बॉस?
10
VIDEO: अरे देवा! 'मोटूलाल'ने प्यायली ७२ लाखांची दारू, जमीनही विकली; मुलाखत झाली व्हायरल
11
इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत संघात स्थान का मिळालं नाही? कुलदीपचं गंभीरबाबत मोठं विधान, म्हणाला...
12
'सकाळी उठतात, डोळे चोळत काहीही पोस्ट करतात...', कंगना राणौतचा राहुल गांधींवर पलटवार
13
तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींचा राग येतो, आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट अटॅकचे ठराल बळी
14
तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच...
15
महायुती सरकारमध्ये सहकारी होण्याचा निर्णय का घेतला? पक्षाच्या चिंतन शिबिरात दादांनी स्पष्टच सांगितलं!
16
कोण होईल रशियाचा पुढचा राष्ट्राध्यक्ष? राजकीय वारसदाराबद्दल व्लादिमीर पुतिन यांचा खुलासा
17
Gold Silver Price 19 September: सोन्याच्या दरात घसरण, पण चांदीच्या किमतीत जोरदार उसळी; कॅरेटनुसार पाहा सोन्याचे नवे दर
18
'हाफिज सईदला भेटलो, याबद्दल मनमोहन सिंग यांनी आभार मानले', यासिन मलिकचा खळबळजनक दावा
19
‘मोहरा’ मध्ये सुनिल शेट्टीसोबत रोमान्स करणारी ही अभिनेत्री आता दिसते अशी, ओळखणंही झालं कठीण
20
अनिल अंबानी यांना दणका; येस बँक कर्ज घोटाळा प्रकरणात CBI कडून चार्जशीट दाखल

तुम्हीही डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर तर नाही? वेळीच सावध व्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 12:38 IST

सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह.

सध्याची धावपळ आणि धकाधकीची जीवनशैली यांमुळे आरोग्याशी निगडी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशातच लहान मुलांपासून ते अगदी थोरामोठ्यांमध्ये सहज आढळून येणारा आजार म्हणजे मधुमेह. अनेक कारणांमुळे मधुमेह होतो. आजकाल अनेक लोक अगदी सर्रास कोणत्या ना कोणत्या तणावाखाली वावरत असतात. या कारणामुळे ही लोक डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर असतात. गोंधळलात ना? थांबा... अहो डायबिटीजची बॉर्डर लाइन म्हणजे या व्यक्तींना मधुमेह झालेला नसतो पण होण्याची शक्यता अधिक असते. तुम्हीदेखील असेच डायबिटीजच्या बॉर्डर लाइनवर उभे असाल तर घाबरून जाऊ नका फक्त तुमच्या दैनंदिन रूटीनकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि थोडे बदल करा. 

डायबिटीजची बॉर्डर लाइन म्हणजे काय?

सामान्य व्यक्तींच्या रक्तामध्ये साखरेची पातळी जेवण न करता 100 आणि जेवल्यानंतर 135 मिलीग्राम असते. जर हेच प्रमाण अनुक्रमे 140 आणि 200 मिलीग्रामपर्यंत पोहोचले तर ही डायबिटीजची बॉर्डर लाइन असते. यामध्ये औषधं खाण्याची गरज नसते परंतु काळजी घेणं गरजेचं असतं. खरं पाहिलं तर ही एक सुचनाच असते. तुम्ही तुमच्या रक्तातील हे प्रमाण नियंत्रणात ठेवून स्वतःचा मधुमेह होण्यापासून बचाव करू शकता. पण जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर मात्र तुम्हीही मधुमेहासारख्या गंभीर आजाराने ग्रस्त होऊ शकता.  मधुमेह होण्याची कारणं :

  • जीवनशैली ठिक नसणं 
  • वेळेवर न झोपणं आणि उठणं
  • सतत तणावाखाली वावरणं
  • चुकीच्या पद्धतीने आहार घेणं
  • व्यायाम न करणं
  • अनुवांशिक कारण

मधुमेहाचे दोन प्रकार :

मधुमेहाचे दोन प्रकार असतात. एक टाइप वन आणि दुसरं टाइप टू डायबिटीज. टाइप वन डायबिटीजचा प्रकार लहान मुलांमध्ये आढळून येतो. शरीरातील वीटासेल डॅमेज झाल्यामुळे लहान मुलांना हा आजार होतो. अशा मुलांना आयुष्यभर इन्सुलिनचं सेवन करावं लागतं. टाइप टू डायबिटीज प्रौढ व्यक्तींमध्ये आढळून येतो. परंतु आता डायबिटीज रूग्णांमध्ये तरूणांचीही संख्या वाढत आहे. 

मधुमेहामुळे खालील समस्यांचा सामना करावा लागू शकतो :

  • सतत भूक आणि तहान लागणं
  • सतत लघवीला होणं
  • थकवा येणं
  • डोळ्यांच्या समस्या किंवा दृष्टी कमी होणं
  • त्वचेला इन्फेक्शन होणं

 असा करा बचाव :

  • गोड पदार्थांचं सेवन टाळा.
  • तळलेले किंवा भाजलेले पदार्थ खाणं टाळा.
  • दर दोन तासांनी थोडं थोडं खाणं आवश्यक. 
  • रक्तातील साखरेचे प्रमाण तपासत रहा.
  • व्यायाम करा. 
टॅग्स :diabetesमधुमेहHealthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स