शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
4
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
5
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
6
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
7
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
8
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
9
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
10
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
11
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
12
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
13
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
14
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
15
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
16
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
17
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
18
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
19
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
20
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?

मोबाइलमुळे मुले ‘स्मार्ट’ होताहेत की...? वेळीच ओळखा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2022 08:09 IST

कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्या. त्यावेळी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. मुलांच्या हाती मोबाइल देणे ही पालकांची अनिवार्यता बनली. मुलांच्या हातात सतत मोबाइल दिसू लागला.

- सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक तंत्रज्ञान बदललं, जीवनशैली बदलली... परिणामी अगदी छोट्या छोट्या मुलांच्याही हातात मोबाइल आले. हे मोबाइल अर्थात स्मार्ट फोन स्मार्ट पिढीचा अविभाज्य भागच बनले. पण मोबाइलचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेवर किती परिणाम करतो? याचा विचार करणे गरजेचे आहे.  

  कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्या. त्यावेळी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. मुलांच्या हाती मोबाइल देणे ही पालकांची अनिवार्यता बनली. मुलांच्या हातात सतत मोबाइल दिसू लागला. आता पुन्हा ऑफलाइन वर्ग सुरू झाले. पण, मुलांचे मोबाइल वेड काही कमी झालेले नाही.     

उपाय काय?  मध्यंतरी महाराष्ट्रातील काही गावांमध्ये विशिष्ट वेळेमध्ये मोबाइल वापरण्यास बंदी घातल्याच्या बातम्या वाचल्या. हा उपाय म्हणून चांगला असला तरी सक्तीपेक्षा स्वतःवर घातलेले निर्बंध महत्त्वाचे वाटतात. यात पालक, शिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे. 

घोळक्यांना आवरायचे कसे?मुलांमधील मोबाइल वेडाचे परिणाम आता हळूहळू बाहेर रस्त्यावरही दिसू लागले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा परिसरात मुलामुलींचे घोळके दिसून येतात. त्यातील मुलांचे वर्तन पाहता अनेक प्रश्न पडतात. 

नजरेस पडतात या गोष्टी... पालक व विद्यार्थ्यांसमोर स्वतःचे वा स्वतःबरोबर आलेल्या मित्रांचे फोटो काढणे.इतर विद्यार्थ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधणे. मुलींना ‘हाय.. हॅलो...’ असा आवाज देणे. बाइकवर बसून राहणे, बाइकचा हॉर्न वाजवित राहणे, मुलींना बाइकवर बसण्याचा आग्रह, इत्यादी. सर्रासपणे अपशब्दांचा वापर करणे.

शाळांची जबाबदारी काय?शालेय प्रशासनसुद्धा पालकांच्या तक्रारी येत नाहीत तोपर्यंत कारवाई करत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालक सभांमध्ये यावर ठोस उपाययोजना करणे अनिवार्य आहे. शाळेबाहेरील अनावश्यक जमावाला निर्बंध घालणे ही शाळा तथा महाविद्यालयांची जबाबदारी आहे.        

शाळा हे करू शकतात  स्वतःच्या किंवा मित्राच्या बाइकवरून फिरणारे किंवा शाळा-महाविद्यालयाच्या भोवती घोळक्याने उभे राहणारे विद्यार्थी वारंवार दिसत असतील तर त्यांच्या पालकांना याबाबत माहिती द्यावी.  शाळेच्या परिसरात विनाकारण जमाव होणार नाही यासाठी स्थानिक पोलिसांचे साहाय्य घ्यावे. माजी विद्यार्थी संघ शाळेशी संलग्न असल्यास त्यांचे सहकार्य घ्यावे.

टॅग्स :Mobileमोबाइल