शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

अॅंटीबायोटिकचं अत्याधिक सेवन शरीराला 'असं' पडू शकतं महागात!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 10:06 IST

अॅंटीबायोटिक(Antibiotics) औषधांचा वापर आता एक सामान्य बाब झाली आहे. अॅंटीबायोटिक औषधांचा वापर आपल्याला बॅक्टेरियाव्दारे झालेल्या संसर्गावर उपचार म्हणून केला जातो.

अॅंटीबायोटिक(Antibiotics) औषधांचा वापर आता एक सामान्य बाब झाली आहे. अॅंटीबायोटिक औषधांचा वापर आपल्याला बॅक्टेरियाव्दारे झालेल्या संसर्गावर उपचार म्हणून केला जातो. सर्दी, खोकला, ताप, टीबी, न्यूमोनिया आणि स्किन इन्फेक्शन यांसाठी हे औषध प्रामुख्याने दिलं जातं. जेणेकरुन आपल्या शरीरातील बॅक्टेरिया नष्ट व्हावे. मात्र तज्ज्ञांनुसार, या औषधांचा अत्याधिक वापर करणे आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरु शकतो. 

एका शोधात आढळलं आहे की, शरीरातील नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती ही संसर्गजन्य रोगांसोबत लढण्यासाठी, जळजळ तसेच सूज कमी करण्यासाठी प्रभावी आहे. मात्र अॅंटीबायोटीकमुळे शरीरातील या नैसर्गिक क्षमतांचा प्रभाव कमी होऊ शकतो. अमेरिकेतील केस वेस्टर्न रिझर्व यूनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी शरीरात राहणारे विषाणू, त्यांचं फॅटी अॅसिड आणि आणखीही काही तत्वांचा जे तोंडाच्या संक्रमणापासून लढण्याची क्षमता ठेवतात यांचं विश्लेषण केलं. 

केस वेस्टर्नमधील सहायक प्राध्यापक पुष्पा पंडियान म्हणाले की, 'या प्रयोगातून आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, जर एखाद्या फंगल इन्फेक्शनसोबत लढण्यासाठी आपल्याजवळ एखादा विषाणू नसेल तर काय होईल'. 

त्यांनी सांगितले की, जीवघेण्या संक्रमणांना नष्ट करण्यासाठी आजही अॅंटीबायोटिकची गरज पडते. पंडियान म्हणाले की, 'आपल्या शरीरात काही नैसर्गिक रोगप्रतिकारक क्षमता आहेत आणि त्यात हस्तक्षेप केला जाऊ नये. तसेच अॅंटीबायोटिकच्या विनाकारण अत्याधिक वापरामुळे कोणताही फायदा होत नाही'.

अॅंटीबायोटिक घेताना ही काळजी घ्यावी

अॅंटीबायोटिक औषधे कॅल्शिअम आणि आयर्नसारख्या व्हिटॅमिन व मिनरल्स घेताना प्रभावी ठरत नाहीत. तसेच अॅंटीबायोटिकचं सेवन केल्यावर काही महिने तुमच्या पचनक्रियेमध्ये बिघाड होऊ शकतो. त्यामुळे काही दिवस पचनाला सोप्या आणि हलक्या पदार्थांचं सेवन करायला हवं.

अॅंटीबायोटिकला काही घरगुती पर्याय

अॅंटीबायोटिक औषधे जितक्या लवकर तुमची समस्या दूर करतात तितका त्याचा शरीरावर वाईट प्रभाव होतो. त्यामुळे अॅंटीबायोटिकला पर्याय म्हणून तुम्ही काही हर्बल औषधांचाही वापर करु शकता. महत्त्वाची बाब म्हणजे याचे आपल्या शरीरावर दुष्परिणामही होत नाहीत. लसणाचे आपल्याला अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. वेगवेगळ्या समस्यांमध्ये याचा औषध म्हणूनही वापर केला जातो. जर्मनीच्या हेल्थ अॅडवाईस असोसिएशननुसार, दररोजच्या जेवणात लसणाचा समावेश करायला हवा. कारण लसणामध्ये अॅंटीबायोटिक गुण असतात. याचा आपल्या शरीरातील विषाणू नष्ट करण्यासाठी फायदा होतो. याच कारणाने जखम धुण्यासाठीही लसणाच्या रसात थोडं पाणी मिश्रित करुन वापरलं जातं. लसणामध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि सल्फाइड भरपूर प्रमाणात असतात. 

टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स