शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

महागडे क्रीम वापरण्याऐवजी रोज खा ही 3 फळं, चेहऱ्यावर कधीच येणार नाही सुरकुत्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 15:40 IST

Anti-aeging Fruits : फळांमधील नॅच्युरल शुगर शरीरासाठी आवश्यक ऊर्जेची कमतरता भरून काढते. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये असे वाटत असेल तर महागडे क्रीम वापरण्याऐवजी काही फळं नियमित खावीत.

Anti-aeging Fruits : वेगवेगळ्या फळांचा आपल्या आरोग्याला किती फायदा होतो हे तुम्हाला माहीत आहेच. सोबतच या फळांमुळे आपल्या त्वचेलाही फायदा मिळतो. इतकंच काय तर काही फळं अशी आहेत जी रोज खाल्ली तर तुम्ही लवकर म्हातारे दिसणार नाहीत. म्हणजे या फळांनी अ‍ॅंटी-एजिंगची समस्या दूर होते. 

फळांमधील नॅच्युरल शुगर शरीरासाठी आवश्यक ऊर्जेची कमतरता भरून काढते. तसेच चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ नये असे वाटत असेल तर महागडे क्रीम वापरण्याऐवजी काही फळं नियमित खावीत. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी तीन खास फळं फायदेशीर ठरतात. चला जाणून घेऊ कोणती आहेत ही फळे...

एवोकाडो

एवोकाडोमध्ये व्हिटॅमिन के, सी, ई, बी आणि ए भरपूर प्रमाणात असतात. यात व्हिटॅमिन ए चं प्रमाण अधिक असतं. याने त्वचेवरील मृत पेशी नष्ट करण्यास आणि नवीन पेशीचं निर्माण करण्यास मदत मिळते. यातील कॅरोटेनॉइडमुळे सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या टॅनिंगपासूनही बचाव होतो.

सफरचंद 

सफरचंद खाल्ल्याने पोटाशी संबंधित समस्या होत नाहीत. तसेच रोज एक सफरचंद खाल्ल्याने शरीरासोबतच त्वचेसाठीही फायदेशीर असतं. सफरचंद सालीसोबतच खाणं अधिक फायदेशीर असतं. अनेकजण साल काढून टाकतात, जे चुकीचं आहे. कारण या सालीमध्ये अ‍ॅंटी-एजिंग तत्व असतात. तसेच याने आतड्यांमध्ये गुड एंजाइम्स वाढतात, ज्याने तुमच्या शरीरात पाणी नियंत्रित राहतं.

पपई

पपईमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स भरपूर असतात. याचं सेवन केल्याने त्वचा मुलायम आणि चमकदार होते. सुरकुत्याही दूर होतात. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि त्वचेसाठी सर्वात फायदेशीर व्हिटॅमिन ई भरपूर असतात. त्यासोबतच कॅल्शिअम, पोटॅशिअम, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम इत्यादीही आढळतात. पपईमध्ये असलेले अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स फ्री रॅडिकल्ससोबत लढण्यासही मदत करतात. याने वाढलेल्या वयाची लक्षणे त्वचेवर दिसत नाही.

टॅग्स :Skin Care Tipsत्वचेची काळजीBeauty Tipsब्यूटी टिप्स