शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

रोज आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, अनेक आजारांचा धोका टळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2024 11:09 IST

Amla juice : अनेकांना हे माहीत नसतं की, रोज कोणत्या फळाचा ज्यूस पिणं जास्त फायदेशीर ठरतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Amla juice : वेगवेगळ्या फळांचा ताजा ज्यूस पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत असतं. ज्यूसमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. याने शरीराला एनर्जी मिळते. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, रोज कोणत्या फळाचा ज्यूस पिणं जास्त फायदेशीर ठरतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आता काही दिवसांमध्ये थंडीला सुरूवात होईल. या दिवसांमध्ये बाजारात आवळे मिळतात. या दिवसांमध्ये सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, आवळ्याचा ज्यूस रात्री पिणं टाळलं पाहिजे. कारण आवळा थंड असतो. अशात आवळा थंड असूनही हिवाळ्यात याच्या ज्यूसचं सेवन कसं करावं, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

आवळा ज्यूसची रेसिपी

२ ते ३ आवळे कापून घ्या. त्यातील बीया वेगळा काढा. अर्धा ते एक ग्लास पाण्यासोबत त्यांना ब्लेंड करा. जेव्हा हे मिश्रण चांगलं मिक्स होईल, तेव्हा ते गाळून घ्या. यात थोडं काळी मिरे पावडर टाका. थोडं मध टाका.

हाडे मजबूत होतील

आवळ्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात कॅल्शिअमही भरपूर असतं. सायन्स डायरेक्टनुसार, आवळ्याचा ज्यूस ऑस्टियोपोरोसिस आजारावर प्रभावी उपाय आहे. या आजारात हाडे कमजोर होतात आणि हाडे मोडण्याचा धोका असतो.

तरूण दिसाल

वय वाढल्यावर त्वचेमधील कोलेजन कमी होतं. यामुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग, ड्रायनेस, डार्क सर्कल आणि त्वचा निर्जीव होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे कोलेजनचं उत्पादन वाढवतं. यामुळे त्वचा तरूण दिसते आणि तुमचं वयही कमी दिसतं.

हृदयासाठी फायदेशीर

आवळ्याचा ज्यूस हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी फार फायदेशीर असतो. काही रिसर्चनुसार, याचं सेवन केल्याने एथेरोजेनिक इंडेक्स कमी होतो. हा इंडेक्स कोलेस्ट्रॉल जमा होण्याच्या शक्यतेबाबत सांगतो. कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने नसा डॅमेज होतात.

इम्यूनिटी वाढते

आवळ्याच्या ज्यूसमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी अ‍ॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. याने फ्री रॅडिकल्स, अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अ‍ॅंटी-मायक्रोबिअल तत्व वाढतात. ज्यामुळे इम्यून सिस्टीमचा प्रभाव वाढतो. तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.

टॅग्स :Healthआरोग्य