शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

Corona Vaccination : दिलासादायक! 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी लस तयार; 'या' अमेरिकन फार्मा कंपनीने मागितली परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2022 14:59 IST

Corona Vaccination : अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) फायझर आणि सहयोगी कंपनी बायोएनटेक (BioNtech) यांना पूर्वनियोजित कार्यक्रमापूर्वी अर्ज करण्यास सांगितले होते.

वॉशिंग्टन : फार्मा कंपनी फायझरने (Pfizer) अमेरिकेला 5 वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कोविड-19 लस मंजूर करण्यास सांगितले आहे, जेणेकरून लहान अमेरिकन मुलांसाठीही लसीकरण मार्चमध्ये सुरू होऊ शकेल. दरम्यान, अमेरिकेच्या फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशनने (FDA) फायझर आणि सहयोगी कंपनी बायोएनटेक (BioNtech) यांना पूर्वनियोजित कार्यक्रमापूर्वी अर्ज करण्यास सांगितले होते.

अमेरिकेत 5 वर्षाखालील 1.9 कोटी मुले आहेत, त्यांना कोरोना विषाणूविरूद्ध लसीकरण करण्यात आले नाही. त्याचबरोबर, अनेक पालक आपल्या मुलांना लसीकरण करून घेण्याचा आग्रह धरत आहेत. विशेषतः अशा वेळी जेव्हा ओमायक्रॉन संसर्गामुळे विक्रमी संख्येने मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. एफडीएने मान्यता दिल्यास फायझर लस 6 महिन्यांपर्यंतच्या मुलांना देखील दिली जाऊ शकते. या लसींचा डोस वयस्कर लोकांना दिलेल्या डोसच्या एक दशांश आहे.

फायझरने म्हटले आहे की,  एफडीएला डेटा देण्यास करण्यास सुरुवात केली आहे आणि काही दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. या मुलांना किती डोस द्यावे लागतील, हा एक मोठा प्रश्न आहे. सुरुवातीच्या चाचणीमध्ये, 2 डोस लहान मुलांसाठी पुरेसे मानले गेले होते, परंतु शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या मुलांसाठी ते पुरेसे नव्हते. फायझर 3 डोसची चाचणी करत आहे आणि मार्च अखेरपर्यंत अंतिम आकडेवारी अपेक्षित आहे.

5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ओमायक्रॉनची बाधाओमायक्रॉनची लागण झालेल्या मुलांची संख्या जास्त असल्याने एफडीएने फायझरला अर्ज करण्यास सांगितले होते. एफडीएच्या प्रवक्त्याने सांगितले की 5 वर्षांपर्यंतच्या मुलांमध्ये ओमायक्रॉन प्रकारांची नोंद झाली आहे. एफडीएचा अंतिम निर्णय काही महिन्यांत येऊ शकतो, परंतु हा एकमेव अडथळा नाही आहे. फायझरला रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रांकडून देखील मान्यता घ्यावी लागेल.

दरम्यान, राष्ट्राध्यक्ष जो बाडयन यांचे प्रशासन मुलांसाठी अँटी-कोविड -19 लसीचे डोस मंजूर करण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. या वयोगटातील शाळा पुन्हा सुरू करून त्या खुल्या ठेवण्यासाठी लसीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यAmericaअमेरिका