शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
4
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
5
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
6
Tamil Nadu Stampede: हेमा मालिनींच्या नेतृत्वात एनडीएचे शिष्टमंडळ करणार ४१ जणांच्या मृत्यूची चौकशी; पीडित कुटुंबांची घेणार भेट
7
Navratri 2025: नवरात्रीचे शेवटचे दोन दिवस महत्त्वाचे; घरी कुंकुमार्चन करून मिळवा देवी कृपा!
8
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
9
शाब्बास पोरा! ६ वेळा नापास, ३ वेळा UPSC क्रॅक; शेतकरी वडिलांच्या सल्ल्याने लेक झाला IPS
10
Navratri 2025: अश्विन शुद्ध सप्तमीला सरस्वतीला आवाहन आणि दशमीला पूजन; ३ दिवसांचा शारदोत्सव का?
11
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
12
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
13
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
14
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
15
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
16
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
17
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
18
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
19
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
20
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक

हिवाळ्यात हिरवे वाटाणे खाण्याचे एकापेक्षा एक फायदे, वाचून व्हाल अवाक्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 09:32 IST

जर आपण हिवाळ्यात नियमितपणे ताजे हिरवे वाटाणे खाल्ले तर आरोग्याला कोणकोणते फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे...

Benefits of Eating Green Peas In Winter:  हिरवे वाटाणे हिवाळ्यात बाजारात मिळतात. तसे फ्रोजेन आणि ड्राय स्वरूपात ते वर्षभर मिळतात. पण फ्रोजन मटर खाणं आरोग्यासाठी चांगले मानले जात नाहीत. त्यामुळे हिरवे ताजे वाटाणे खाण्याचाच सल्ला दिला जातो. डायटीशिअन आयुषी यादव (Ayushi Yadav) यांनी सांगितलं की, जर आपण हिवाळ्यात नियमितपणे ताजे हिरवे वाटाणे खाल्ले तर आरोग्याला कोणकोणते फायदे होतात. चला जाणून घेऊ फायदे...

1) भरपूर प्रोटीन

हिरव्या वाटाण्यांमध्ये प्लांट बेस्ट प्रोटीनचं प्रमाण भरपूर असतं. जर यांचं नियमित सेवन केलं तर हाडे आणि मांसपेशी मजबूत होतील. सोबतच मसल्स रिपेअर करण्यासही मदत मिळेल. सोबतच मुलांच्या शरीराच्या विकासातही याने मदत मिळते.

2) फायबर भरपूर असतात

हिरव्या वाटाण्यामध्ये फायबर भरपूर असतं. हे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेलं राहतं. ज्यामुळे तुम्ही जास्त जेवण करण्यापासून वाचता  आणि हळूहळू वजन कमी होऊ लागतं. ज्यांना वजन कमी करण्याची इच्छा असते त्यांच्यासाठी हे फार फायदेशीर ठरू शकतात.

3) डायबिटीसमध्ये फायदेशीर

हिरव्या वाटाण्यांमध्ये ग्लायसिमिक इंडेक्स फार कमी असतो आणि याने ब्लड शुगर लेव्हल रेग्युलेट करण्यास मदत मिळते. त्यासोबतच याने अचानक शुगर वाढणंही रोखलं जातं तसेच फायबरमुळे कार्बोहायड्रेटचं एब्जॉर्ब्शनही कमी होतं. हेच कारण आहे की, हिरवे वाटाणे डायबिटीसच्या रूग्णांसाठी बेस्ट डाएट मानले जातात.

4) हृदयासाठी फायदेशीर

हिरव्या वाटाण्यांमध्ये असे अनेक मिनरल्स आढळतात जे हृदयाचं आरोग्य चांगलं करण्यास मदत करतात. म्हणजे मॅग्नेशिअम, पोटॅशिअम आणि कॅल्शिअम हे सगळे पोषक तत्व ब्लड प्रेशर नॉर्मल ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी होतो. सोबतच याने नसांमधील बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होतं.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सWinter Care Tipsथंडीत त्वचेची काळजी