शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
4
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
5
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
6
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
7
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
8
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
9
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
10
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
11
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
12
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
13
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
14
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
15
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
16
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
18
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
19
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
20
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई

नकली जिऱ्यामुळे होऊ शकतो स्टोन आणि कॅन्सरचा धोका, कशी पटवाल ओळख?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 10:58 IST

अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही.

अलिकडे दुधापासून ते तांदळापर्यंत कितीतरी गोष्टींमध्ये भेसळ होताना बघायला मिळते. ही इतक्या हुशारीने केली जाती की, सहजासहजी लक्षातही येत नाही. आता तर राजस्थान आणि गुजरातमध्ये नकली जिऱ्याचा धंदा चांगलाच वाढला आहे. दिल्लीत पहिल्यांदाच पकडण्यात आलेल्या नकली जिऱ्याने मोठी चिंता वाढली आहे. हे जिरं जंगली गवत, गूळाचं पाणी आणि दगडांची पावडर मिळून तयार केलं जातं. जे आरोग्यासाठी चांगलंच नुकसानकारक आहे. नकली जिऱ्याच्या सेवनाने केवळ स्टोनचाच नाही तर याचं नियमित सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीही कमजोर होते. तसेच कॅन्सरचाही धोका होतो.

यावर डॉक्टरांचं मत आहे की, ही भेसळ फार घातक आहे आणि सामान्य लोकांच्या जीवनासोबत खेळणं झालं. हे लगेच थांबवलं पाहिजे. न्यूट्रिशननिस्ट डॉक्टर अनिता लांबा यांनी नवभारत टाइम्सला सांगितले की, ज्याप्रकारे हे जिरं तयार केलं जातंय किंवा त्यात ज्या गोष्टी मिश्रित केल्या जातात त्याने स्टोनचा धोका अधिक आहे. 

तसेच याने रोगांसोबत लढण्याची क्षमताही कमी होते. त्या म्हणाल्या की, मनुष्याचं शरीर भेसळयुक्त पदार्थ खाण्यासाठी तयार झालेलं नाही. तसेच एका दुसऱ्या डॉक्टरांनी याबाबत सांगितले की, या जिऱ्याने कॅन्सर होऊ शकतो किंवा त्वचेसंबंधी आजारही होऊ शकतात.

कसं तयार केलं जातं हे जिरं?

यासाठी एक खासप्रकारचं गवत वापरलं जातं. ते गुळाच्या पाण्यात मिश्रित करून सुकवलं जातं. याने गवताना रंग जिऱ्याच्या रंगासारखा होतो. नंतर जिऱ्याला चमक आणि ठोस करण्यासाठी त्यात दगडाची पावडर मिश्रित केली जाते. हे प्रामुख्याने गुजरात आणि राजस्थानमध्ये अनेक महिन्यांपासून सुरू आहे. इथून देशातील इतर भागांमध्ये जिरं पाठवलं जात आहे. 

कशी पटवाल ओळख?

नकली जिऱ्याची ओळख पटवण्यासाठी एका वाटीमधे पाणी घ्या. हे जिरं पाण्यात टाकल्यावर काही वेळाने विरघळू लागतं. त्याचा रंग जातो. तेच ओरिजनल जिरं पाण्यात टाकल्यानंतरही विरघळत नाही. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य