शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

Adenovirus : पश्चिम बंगालमध्ये नवीन व्हायरसमुळे खळबळ, लोकांमध्ये भीतीचे वातावरण, 'ही' आहेत लक्षणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 11:43 IST

Adenovirus Flu Symptoms : गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसने कहर केला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

गेल्या दोन-तीन वर्षात कोरोना व्हायरसमुळे देशासह जगभरात हाहाकार माजला आहे. दरम्यान, आता एका नवीन व्हायरसने खळबळ उडवून दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसने कहर केला असून लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या व्हायरसचे नाव एडेनोव्हायरस (Adenovirus) आहे. पश्चिम बंगालमध्ये या व्हायरसची अनेक प्रकरणे समोर आली असून, त्यानंतर प्रशासनही अलर्टवर आहे.

बदलत्या ऋतूत लोकांना आजारांचाही धोका असतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या मते, एडेनोव्हायरस हा असा व्हायरस आहे, ज्यामुळे सामान्यतः श्वसनाचे आजार, सौम्य सर्दी किंवा फ्लूसारखे आजार होतात. एडेनोव्हायरसच्या कारणांमध्ये इन्फ्लूएंझा, पॅराइन्फ्लुएंझा, राइनोव्हायरस आणि न्यूमोकोसी यांचा समावेश आहे. 

लक्षणंएडेनोव्हायरस संसर्गाच्या सर्वात सामान्य लक्षणांमध्ये 3 दिवसांपेक्षा जास्त दिवस सतत ताप येणे, खोकला, घसा खवखवणे, सर्दी, अतिसार, उलट्या आणि जलद श्वास घेणे यांचा समावेश आहे. या व्हायरसमुळे लहान मुले, आधीच श्वसन रोग आणि इतर गंभीर आजार असलेल्या लोकांना जास्त धोका असतो.

उपचारएडेनोव्हायरस फ्लूवर कोणताही इलाज नसला तरी, सौम्य लक्षणांवर ओआरएस, सकस आहार आणि लक्षणात्मक काळजी घेऊन घरीच उपचार करता येतात. जर ताप 3-5 दिवसांपेक्षा जास्त काळ राहिल्यास किंवा तुम्ही श्वासोच्छवास जलद किंवा ताणतणाव घेत असल्यास, भूक न लागणे आणि दिवसातून पाचपेक्षा कमी वेळा लघवी होत असल्यास, रुग्णालयात जा आणि स्वतःची तपासणी करा.

बचावप्रतिबंधासाठी मास्क घालणे, हाताची स्वच्छता राखणे आणि कोरोना व्हायरसप्रमाणेच इतर उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याHealthआरोग्यwest bengalपश्चिम बंगाल