अभिजीत, नेहा आणि श्रुतीची दोस्ती भारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2016 06:12 IST
या तिन्ही मराठी कलाकारांची दोस्ती मात्र लय भारी असल्याचे अभिजीत खांडकेकर याने लोकमत सीएनएक्सला सांगितले.
अभिजीत, नेहा आणि श्रुतीची दोस्ती भारी
मराठी इंडस्ट्रीचे सुंदर कलाकार अभिजीत खांडकेकर, नेहा पेंडसे आणि श्रुती मराठे या तिघांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकली आहे. ही तिन्ही कलाकार जरी कधी एका चित्रपटातून पडदयावर झळकले नसले तरी, या तिन्ही मराठी कलाकारांची दोस्ती मात्र लय भारी असल्याचे अभिजीत खांडकेकर याने लोकमत सीएनएक्सला सांगितले. अभिजीत म्हणाला, श्रुती मराठे आणि मी एकाच एरियामध्ये राहतो त्यामुळे सुखदा,मी व श्रुती नेहमी डिनरला वगैरे सोबतच जातो. नुकतेच श्रुतीने आणि मी कॉफीला जायचे प्लॅनिंग केले होते. आणि त्या कॉपी शॉपच्या जवळच नेहाच्या मालिकेचे शुटिंग चालू होते. त्यामुळे साहिजकच नेहादेखील आमच्या कॉफी पार्टीमध्ये शामील झाली. आम्ही तिघांनी मिळून खूप धमाल व मस्ती केली.असो, या सेलेब्रिटींची ही दोस्ती अशीच रंगू दे यासाठी शुभेच्छा.