शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर हृदयातून काढली गाठ; डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2022 08:50 IST

गाठीचा आकार १२.७५ से.मी. मध्य प्रदेशातील सौंसर येथील ३५ वर्षीय रुग्णाच्या हृदयात गाठ असल्याने त्याला नीट श्वास घेता येत नव्हते.

स्नेहलता श्रीवास्तवनागपूर : सलग ८ तासाच्या शस्त्रक्रियेनंतर एका ३५ वर्षीय व्यक्तीच्या हृदयातून १२.७५ से.मी. आकाराची गाठ (एन्युरिझम) काढून शहरातील डॉक्टरांनी या रुग्णाला नवे जीवन दिले. मंगळवारी झालेल्या या जोखमीच्या शस्त्रक्रियेमुळे केवळ वैद्यकीय क्षेत्राचेच नव्हे, तर नागपूरचेही नाव उंचावले. विशेष म्हणजे, देशातील एवढ्या मोठ्या आकाराचे ‘एन्युरिझम’ काढण्याची ही दुसरी घटना आहे. पहिल्या प्रकरणात चेन्नई येथील डॉक्टरांनी गेल्या वर्षी जवळजवळ एवढ्याच आकाराचे ‘एन्युरिझम’ काढले होते.            

मध्य प्रदेशातील सौंसर येथील ३५ वर्षीय रुग्णाच्या हृदयात गाठ असल्याने त्याला नीट श्वास घेता येत नव्हते. झोपताही येत नव्हते. अत्यंत गंभीर स्थितीत हा रुग्ण कार्डियो वस्कूलर सर्जन डॉ. सौरभ वार्षणे यांच्याकडे दाखल झाला. अशा स्थितीत तो आतापर्यंत कसा जिवंत राहिला, याचेच डॉक्टरांना आश्चर्य वाटले. या रुग्णावर ‘बेंटल सर्जरी’ करण्यात आली.      

जगाच्या इतिहासात आतापर्यंत सर्वात मोठी १४ से.मी. गाठ काढल्याची नोंद आहे. मंगळवारी शहरात झालेली ही शस्त्रक्रिया अलीकडच्या काळात सर्वात मोठी शस्त्रक्रिया आहे. याला ज्येष्ठ हृदयरोग शल्यचिकित्सक डॉ. पी. के. देशपांडे यांनीही दुजोरा दिला. ही शस्त्रक्रिया डॉ. वार्षणे यांच्या नेतृत्वात, बधिरीकरण तज्ज्ञ डॉ. श्रीकांत बोबडे, हृदयविकार तज्ज्ञ गिरीश गौतम, डॉ. दर्शनी सोनी, परिचारिका राणी शेख व ब्रदर जफ्फार खान आदींनी यशस्वी केली.