शहरं
Join us  
Trending Stories
1
'...तर हिंदूंसाठी एकही देश शिल्लक राहणार नाही'; मुस्लीम लोकसंख्या वाढीवरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा
2
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
3
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
4
BANW vs INDW : भारतीय महिलांनी रचला इतिहास; बांगलादेशला त्यांच्यात घरात ५-० ने नमवले
5
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
6
हरियाणातील BJP सरकार कोसळणार? काँग्रेसने केला बहुमताचा दावा, राज्यपालांना लिहिले पत्र...
7
"आम्हाला रस्त्यावर आणून तू विदेशात स्थायिक", पालकांची ४ पानी सुसाईड नोट, डोळ्यात येईल पाणी
8
संजू सॅमसनला बाद ठरवणाऱ्या Controversial  निर्णयाचा नवा Video, अखेर सत्य समोर आलेच... 
9
'सिकंदर' ची घोषणा झाल्यानंतर सलमान-रश्मिकाचा जुना व्हिडिओ व्हायरल, भाईजानचं तेलुगू ऐका!
10
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
11
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
12
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
13
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
14
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
15
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
16
मुग्धा गोडसे भडकली, मॉलमधील एका कॅफेत आईला मिळाली वाईट वागणूक; प्रकरण काय?
17
चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी, सुरू आहे Moon Express ची तयारी; NASA थेट रेल्वेच चालवणार!
18
"देशात भाजपा एकटीच 370 पेक्षा जास्त जागा जिंकेल..."; शिवराज सिंह चौहान यांचा मोठा दावा
19
हरियाणामध्ये राजकीय हालचालींना वेग, 'बहुमत चाचणी घ्या', माजी उपमुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी
20
“पराभवाच्या भितीने भांबावल्यानेच नरेंद्र मोदींकडून दररोज असत्य विधाने”; काँग्रेसची टीका

जीटी आणि कामा रुग्णालय मिळून एक मेडिकल कॉलेज; वैद्यकीय शिक्षण विभागाने दिली मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 7:22 AM

नव्याने सुरू होणाऱ्या कॉलजेच्या अधिष्ठातापदी डॉ.जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण मुंबईतील जीटी रुग्णालयाचे रूपांतर मेडिकल कॉलेजमध्ये करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभाग जोरदार तयारी करत आहे. केवळ एकट्या जीटी रुग्णालयाचे कॉलेजमध्ये रूपांतर करणे अवघड आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मानांकनाची पूर्तता करण्यासाठी कामा रुग्णालय आणि जीटी रुग्णालयाला संलग्नीकरण करणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रक्रियेस वैद्यकीय शिक्षण विभागाने मान्यता दिल्याने, आता दोन्ही रुग्णालयांचे मिळून मेडिकल कॉलेज तयार होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

देशात मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची परवानगी बंधनकारक असते. त्यांची परवानगी मिळविण्यासाठी त्यांच्या मानांकनांची पूर्तता गरजेचे असते. त्यामध्ये सर्वसाधारणपणे सर्व एमबीबीएस अभ्यासक्रम शिकविण्यासाठी लागणाऱ्या सर्व विषयांचे विभाग, लेक्चर हॉल, रुग्णालयातील विशिष्ट बेड्सची संख्या, प्रयोगशाळा या आणि अशा तत्सम गोष्टींची गरज असते. त्याची पूर्तता करता यावी, म्हणून कामा रुग्णालयाची मदत लागणार असल्याने, त्या दोन्ही रुग्णालयाचे संलग्नीकरण करून मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. 

वैद्यकीय शिक्षण विभागाने हे मेडिकल कॉलेज सुरू करण्यासाठी आता विविध पदांवरील ५६ अध्यापकांची नुकतीच या ठिकाणी नेमणूक केली आहे.  आयोगाची तज्ज्ञ समिती महाविद्यालय पाहणी करण्यासाठी कधीही येऊ शकतात, त्यामुळे वैद्यकीय शिक्षण विभागाने अध्यापकांची नेमणूक केल्याचे सांगण्यात येत आहे.

कॉलेज सुरू करण्यासाठी शासनातर्फे लागणारे सक्षमता प्रमाणपत्र आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून बंधनकारक असणारे संलग्नीकरण प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे आता केवळ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडून लागणारी अंतिम परवानगी मिळणे बाकी आहे. आयोगाची परवानगी मिळाली, तर या वर्षी हे महाविद्यालय सुरू होईल, असे वरिष्ठ डॉक्टरांनी सांगितले.

अधिष्ठातापदी डॉ. जितेंद्र सकपाळ

वैद्यकीय शिक्षण विभागाने नव्याने सुरू होणाऱ्या या कॉलजेच्या अधिष्ठातापदी डॉ.जितेंद्र सकपाळ यांची नियुक्ती केली आहे. सध्या डॉ.सकपाळ जनरल सर्जरी  विभागाचे प्राध्यापक म्हणून अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत आहे. त्यांनी त्या पदाचा कार्यभार संभाळून या कॉलेजच्या अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे आदेश विभागाने काढले आहेत.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलMumbaiमुंबईMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालय