शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

दोन सेकंदाला एक मूल वेळेआधीच येतेय जन्माला; ‘प्री-मॅच्युअर’ मुले जन्माला येण्याचे प्रमाण वाढले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 12:29 IST

जगभरात प्रत्येक दोन सेकंदाला एक मूल हे वेळेआधीच (प्री-मॅच्युअर) जन्माला येत आहे.

जिनिव्हा : जगभरात प्रत्येक दोन सेकंदाला एक मूल हे वेळेआधीच (प्री-मॅच्युअर) जन्माला येत आहे. यातील एका बालकाचा दर ४० सेकंदाला मृत्यू  होतो. संयुक्त राष्ट्रांच्या एजन्सीने जारी केलेल्या नव्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.

राहुल गांधींना शिक्षा सुनावणाऱ्या जजचे प्रमोशन रोखले; सुप्रीम कोर्टाने फटकारले, परत पाठवले!

अहवालानुसार, २०२० मध्ये वेळेआधीच जन्मलेल्यांमध्ये (गर्भधारणेच्या ३७ व्या आठवड्यापूर्वी जन्मलेले बाळ) जवळपास अर्धे हे भारत, पाकिस्तान, नायजेरिया, चीन आणि इथिओपिया या पाच देशांमधील आहेत. या पाच देशांमध्ये जगभरातील ४५ टक्के अकाली बाळांना जन्म दिला जातो. यामध्येही भारतात सर्वाधिक ३०.१६ लाख अकाली मुलांचा जन्म झाला. या मुलांचा मृत्यू होण्याचा धोका जास्त असतो.

१ कोटी ३४ लाख बाळे वेळेआधीच जन्माला

एकूण ४६ देशांमधील १४० हून अधिक जणांच्या मदतीने बॉर्न टू सून : डेकेड ऑफ ॲक्शन ऑन प्री-टर्म बर्थ हा अहवाल तयार करण्यात आला आहे.२०२० मध्ये जवळपास १ कोटी ३४ लाख मुले वेळीआधी जन्माला आली. यातील वेळेआधी जन्मलेल्या मुलांचा जन्मदर हा बांगलादेशमध्ये १६.२ टक्के असून, भारतामध्ये वेळीआधी जन्मलेल्या बाळांची संख्या सर्वाधिक होती.

वेळेआधी मुले का जन्माला येतात?

ही कारणे समानता आणि अधिकार, शिक्षण, संसाधने, पर्यावरणाशी संबंधित आहेत. महिलांना समान वागणूक, उत्तम शिक्षण, आरोग्यावर होणारा खर्च आणि वायू प्रदूषण ही कारणे यात प्रामुख्याने आहेत. अहवालानुसार, दरवर्षी ६० लाख मुले वायू प्रदूषणामुळे मुदतपूर्व जन्म घेतात.

टॅग्स :Healthआरोग्य