शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

५-१० मिनिटांची डुलकी देईल तुम्हाला ‘पॉवर’! कसं ते जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2022 05:59 IST

‘टार्गेट’च्या बोजामुळे अनेकांना काही वेळा रात्रीही पुरेशी झोप मिळत नाही आणि दिवसा तर डुलकीसाठी दहा-पंधरा मिनिटेही काढणं त्यांच्यासाठी अशक्य असतं.

पॉवर नॅप किती महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुमचा मूड, सतर्कता, उत्पादकता, अल्पकालीन स्मृती.. इत्यादी अनेक गोष्टी कशा सुधारतात, विशेषत: काही ठराविक प्रसंगी कमी झोपेवर पॉवर नॅपमुळे कशी प्रभावी मात करता येते, याची माहिती आपण गेल्या लेखात पाहिली. अटीतटीच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी या पॉवर नॅपचा फारच उपयोग होतो. 

अनेकांना दुपारी झोपायची, वामकुक्षी, डुलकी घेण्याची सवय असते. पण या काळात ते तासन्तास चक्क झोपा काढतात. मात्र, तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ज्यांना गरज आहे त्यांनीच दुपारच्या वेळी फक्त दहा मिनिटांची एखादी छोटी डुलकी घ्यावी. दिवसभरातील आपली सतर्कता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी ही दहा मिनिटांची डुलकी त्यांना नवी संजीवनी देऊन जाईल. अनेक तज्ज्ञ सांगतात, दुपारची वामकुक्षी १५ ते ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. त्यापेक्षा जास्त काळ तुम्ही झोपला, तर मग अतिशय गाढ अशा झोपेकडे तुमचा प्रवास होतो आणि त्या झोपेतून उठणं, पुन्हा कामाला लागणं, विशेषत: उत्साहानं काम करणं अवघड होऊन जातं.

‘टार्गेट’च्या बोजामुळे अनेकांना काही वेळा रात्रीही पुरेशी झोप मिळत नाही आणि दिवसा तर डुलकीसाठी दहा-पंधरा मिनिटेही काढणं त्यांच्यासाठी अशक्य असतं. पण जर त्यांना आपल्या बिझी शेड्यूलमधून केवळ पाच मिनिटे जरी काढता आली आणि त्या काळात ते नुसते डोळे मिटून बसले, तरीही त्यांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो. एकदम फ्रेश वाटू शकतं आणि तरतरी येऊ शकते. ही पाच मिनिटं, दहा मिनिटं.. अतिशय महत्त्वाची. ती तुम्हाला खरोखर ‘पॉवर’ देऊन जातात. पण ज्यांना खरोखरच झोप मिळालेली नाही किंवा काही करणानं ज्यांना झोप घेता येत नाहीए त्यांच्यासाठीच पॉवर नॅप गरजेची. इतरांना किंवा ज्यांना पुरेशी झोप मिळालेली आहे, त्यांना या पॉवर नॅपची गरज नाही. या काळात डुलकी घेण्याऐवजी पाच-दहा मिनिटे ते जलद चालले, एक मिनीट स्क्वॉट्स (बैठका) मारल्या, पुशअप्स काढले तरी त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. पॉवर नॅप नेमकी कशी घ्यायची, हे पाहूया पुढच्या भागात..

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्स