शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्युकर मायकोसिसचे ८ बळी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 14:26 IST

नाशिक : कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकर मायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

 कोरोनाबाधितांवरील उपचारात काही मधुमेही रुग्णांना होत असलेल्या म्युकर मायकोसिस आजाराने आतापर्यंत जिल्ह्यात ८ बळींची अधिकृत नोंद झाली आहे. जिल्ह्यात सध्या १८९ रुग्णांची अधिकृत नोंद असून ही संख्या यापेक्षाही खूप मोठी असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.कोरोनाबाधितांवर उपचार करताना स्टेरॉईड आणि तत्सम इंजेक्शनच्या वापरामुळे नाशिक शहरात आतापर्यंत१२७ तर जिल्ह्यात एकूण मिळून १८९ रुग्ण आढळून आले आहेत. मालेगाव आणि नाशिक शहरातच सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही रुग्ण असण्याची शक्यता असली तरी ग्रामीण भागात अधिक प्रमाणात नाक,कान,घसा तज्ज्ञ किंवा दंतरोगतज्ज्ञ नसल्याने ग्रामीण भागात फारशी प्रकरणे उघडकीस आलेली नाहीत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नाशिक शहराबरोबरच ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात बळी गेले आहेत. त्यात प्रामुख्याने कोमॉर्बिड रुग्णांचाच भरणा अधिक आहे.

३४ रुग्ण बरे झाल्याची नोंद

नाशिक शहरात १२७ तर जिल्ह्यात एकूण १८९ म्युकर मायकोसिसच्या रुग्णांची अधिकृतरित्या नोंद झालेली आहे. त्यातील १२९ रुग्ण खासगी रुग्णालयांमध्ये, २४ रुग्ण अधिग्रहीत कोविड सेंटरमध्ये तर २ शासकीय रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. आतापर्यंत त्यातील ३४ रुग्णांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, अधिकृत नोंदीपेक्षाही ज्यांना या आजाराचा त्रास होऊनही त्याबाबत फारशी माहितीच नाही किंवा कोरोनाच्या दुष्परिणामामुळे असा त्रास होत असेल, असाच ज्यांनी समज करुन घेतला अशा रुग्णांची संख्या अधिकृत नोंदीपेक्षाही अधिक असण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Healthआरोग्यNashikनाशिक