शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

औषधांचा वापर न करता किडनी स्टोन करू शकता दूर, बेस्ट 7 घरगुती उपाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2024 11:04 IST

Kidney Stone : काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

Kidney Stone : किडनी स्टोनच्या उपचारासाठी अनेक प्रकारची औषधे बाजारात आहेत. त्यासोबतच ऑपरेशन करुनही यापासून सुटका मिळवली जाऊ शकते. मात्र, काही घरगुती उपायांनीही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकतात. चला जाणून घेऊया किडनी स्टोनवर काही घरगुती उपाय....

1) तुळशीच्या पानांचा रस

तुळशीमध्ये एसिटिक अ‍ॅसिड असतं. जे किडनीतील स्टोन तोडण्यासाठी आणि वेदना कमी करण्यासाठी मदत करतं. तुळस आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुळशीच्या रसामध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी तत्व असतात आणि यामुळे किडनी निरोगी ठेवण्यास मदत मिळते.

2) लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑइल

वर्षानुवर्षे लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑईल मिश्रित करुन गॉलब्लेडरच्या स्टोनसाठी सेवन केलं जातं. पण हा उपाय किडनी स्टोनसाठीही फायदेशीर आहे. लिंबाच्या रसात असलेलं सॅट्रिक अ‍ॅसिडमध्ये कॅल्शिअम बेस असलेल्या स्टोनला तोडण्याची क्षमता असते आणि पुन्हा स्टोन तयार होऊ देत नाही. हे मिश्रण तयार करण्यासाठी लिंबाचा रस आणि ऑलिव्ह ऑईल समान प्रमाणात मिश्रित करा आणि दिवसातून तीन वेळा याचे सेवन करा. 

3) डाळिंब

डाळिंबाचा रस आणि बीयांमध्ये अ‍ॅस्ट्रीजेंट गुण असतात. जे किडनी स्टोनवर उपचारासाठी फायदेशीर असतात. जर तुमच्या किडनीमध्ये स्टोन असेल तर रोज एक डाळिंब खावं किंवा त्याचा रस फायदेशीर होऊ शकतो. यासोबतच डाळिंबाला फ्रूट सॅलडमध्येही मिश्रित करुन खाऊ शकता. 

4) कलिंगड

मॅग्नेशिअम, फॉस्फेट्स, कार्बोनेट आणि कॅल्शिअमपासून तयार झालेल्या किडनी स्टोनच्या उपचारासाठी कलिंगड फारच उपयुक्त आहे. कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पोटॅशिअम असतं, जे किडनीसाठी फारच उपयुक्त आहे. पोटॅशिअम लघवीतील अ‍ॅसिड लेव्हल नियंत्रीत ठेवण्यासाठी मदत करतं. पोटॅशिअमसोबतच कलिंगडामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं, यामुळे स्टोन नैसर्गिक पद्धतीने शरीराबाहेर काढला जाऊ शकतो.

5) राजमा

राजम्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असतं. राजमा हा किडनी बिन्स नावानेही ओळखला जातो. राजमा किडनी आणि ब्लेडरशी संबंधीत वेगवेगळ्या आजारांवर उपाचारासाठी फायदेशीर आहे. ज्या पाण्यात राजमा भिजवून ठेवला असेल ते पाणी प्यायल्यासही फायदा होतो. 

6) ओव्याचं पाणी

ओवाचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करतं. याने किडनी स्टोनची समस्या दूर करण्यासही मदत मिळते. याचा वापर फार आधीपासून पारंपारिक औषधी म्हणून केला जातो. एक किंवा दोन चमचे ओवा एक किंवा दोन ग्लास पाण्यासोबत ब्लेंड करा आणि दिवसभर याचं थोडं थोडं सेवन करा.

7) व्हीटग्रास ज्यूस

व्हीटग्रासमध्ये अनेक पोषक तत्व असतात आणि आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी यातून अनेक फायदे मिळतात. एका रिसर्चनुसार, व्हीटग्रास किडनी स्टोन दूर करण्यासही मदत करतं. याने लघवीचा प्रवाह वाढतो. यात अनेक महत्वाचे पोषक तत्व असतात जे किडनी साफ करण्याचं काम करतात. दररोज 1 ग्लास व्हीटग्रास ज्यूस पिऊ शकता.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य