(Image Credit : www.health.com)
काही लोकांची लाइफस्टाईल इतकी व्यक्त असते की, त्यांना वर्कआउट करण्यासाठी जराही वेळ मिळत नाही. वजन वाढतच जातं, पण त्यांना याची अजिबात चिंता नसते की, पुढे जाऊन यामुळे वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागेल. अशात वजन कमी करायचं म्हटलं तर लोकांना केवळ डायटिंग हा एकच उपाय माहीत आहे. पण कोणताही विचार किंवा प्लॅनिंग न करता डायटिंग करणंही आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. याने तुम्ही शारीरिक रूपाने कमजोर होऊ शकता. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही हेल्दी सवयींची माहिती घेऊन आलो आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही वजन कमी करू शकाल.
फॅट बर्निंग फूड्सचा डाएटमध्ये समावेश
आहारात अशा पदार्थांचा समावेश करा ज्यात कॅलरी कमी असतील. काही फूड्स असे असतात जे फॅट बर्न करण्याचं काम करतात. हे फॅट बर्न करणारे फूड्स मेटाबॉलिक प्रक्रियेचा वेग वाढवतात आणि यामुळे तुम्हाला जास्त किंवा सतत भूक लागत नाही. ओट्स, बदाम, अंडी, हिरव्या भाज्या, ग्रीन टी, राजमा, वेगवेगळ्या डाळी, कडधान्य, हिरवी मिरची इत्यादी भरपूर खा.
लिंबाचा रस
नियमितपणे लिंबू-पाणी सेवन करा. लिंबू-पाणी तुम्ही दिवसा सकाळी किंवा दिवसा कधीही सेवन करू शकता. याने शरीराची मेटाबॉलिक प्रक्रिया वेगाने होते, ज्यामुळे शरीरातील अधिकाधिक कॅलरी बर्न होतात. यातील व्हिटॅमिन सी शरीरात फॅट जमा होऊ देत नाही. तुम्ही चांगल्या परिणामांसाठी लिंबाचा रस कोमट पाण्यात टाकून, त्यात काही मधाचे थेंब टाकून सेवन करा.
अन्न चाऊन चाऊन खावे
तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की, जेवण घाईघाईने करू नये किंवा काहीही खाताना हळूहळू खावं. जेव्हा तुम्ही घाईने काही खाता तेव्हा जास्त खाता. तसेच तोंडात हवाही अधिक जाते. लठ्ठपणा वाढण्याचं हेच मुख्य कारण आहे. आरामात चाऊन चाऊन खाल्ल्याने अन्नही लवकर पचेल आणि तुमचं वजनही वाढणार नाही.
साखर कमी खावी
तज्ज्ञ लोक साखरेला गोड विष असं म्हणतात. १ चमचा साखरेत १६ कॅलरी असतात. तुम्ही ज्या पद्धतीने साखरेचा वापर करता, ते फार नुकसानकारक ठरतं. साखरेचा वापर दूध, मैदा, खवा यात केल्याने वजन वाढतं. अशात साखरेचं सेवन कमी करणे फायदेशीर ठरतं. चहा/कॉफी, दुकानात मिळणारे फळांचे ज्यूस, सॉफ्ट ड्रिंक्स, चॉकलेट, बिस्किट, पेस्ट्रीज, केक इत्यादी पदार्थ अधिक खाऊ नका. साखरेऐवजी तुम्ही गूळ, मध यांचा वापर करू शकता.
डाएट प्लॅन करा
वजन कमी करायचं असेल तर तुम्ही एक डाएट प्लॅन तयार करणं फार गरजेचं आहे. डाएट प्लॅन तयार करून फॉलो केल्याने तुम्हाला वजन कमी करणं सोपं जाईल. डाएट प्लॅन करणं म्हणजे अनेकांना वाटतं की, कमी खाणं. पण असं अजिबात नाहीये. डाएटमध्ये न्यूट्रिशन फूड्सचा समावेश करावा लागतो. वजन कमी करण्यासाठी न्यट्रीशनल डाएटमध्ये ५० टक्के कार्बोहायट्रेट, २० टक्के प्रोटीन आणि ३० टक्के फॅक्ट असावं.
कधी उपाशी राहू नये
तुम्ही जर फार जास्त वेळ उपाशी राहत असाल आणि अशा स्थितीत काहीतरी चटपटीत, गोड किंवा जंक फूड खाण्याची इच्छा वाढते. या सर्वच गोष्टी अनहेल्दी आहेत. भूक लागल्यावर जेव्हा तुम्ही जेवण करता, तेव्हा घाईघाईने जरा जास्तच खाता. दोन्ही कारणांमुळे तुम्ही कॅलरी अधिक घेता. असं करू नका. वजन कमी करण्यासाठी दिवसातून काही वेळा थोडं थोडं खावं. म्हणजे दर तीन तासांनी थोडं थोडं खावं. जेणेकरून जोरात भूकच लागणार नाही.