शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

चुरडीच्या तलावावर जि.प.चा अधिकारच नाही !

By admin | Updated: August 26, 2016 01:27 IST

तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने

वनविभागाची मालकी : अदानी प्रकल्पाला तीन महिन्यांपूर्वीच हस्तांतरिततिरोडा : तिरोडा शहरापासून ४ कि.मी.वर चुरडी-गराडा परिसरात असलेला नवीन तलाव (भुताया तलाव) अदानी प्रकल्पाच्या व्यवस्थापनाने आपल्या कामासाठी फोडल्याने त्या तलावात मासेमारी करणाऱ्या संस्थेसह काही शेतकऱ्यांनी तसेच जिल्हा परिषदेने त्यावर आक्षेप घेतला आहे. मात्र वनविभागाच्या मालकीची ती जागा तीन महिन्यांपूर्वीच अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली असल्याने जिल्हा परिषदेचा त्यावरील अधिकारच संपुष्टात आला असल्याचे स्पष्ट दिसत आहे.त्या जागेवर जिल्हा परिषदेची मालकी नसताना जि.प.ने संबंधित मच्छीमार संस्था व शेतकऱ्यांना अंधारात ठेवल्याचे दिसून येत आहे. तिरोड्यात गुरूवारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी बोलविलेल्या बैठकीत उपविभागीय अधिकारी सूर्यवंशी व तहसीलदार चव्हाण यांनी गटविकास अधिकाऱ्यांना त्या तलावाच्या मालकी हक्कासंदर्भात जिल्हा परिषदेकडे काय कागदपत्रे आहेत? असा प्रश्न केला. मात्र बिडीओंनी त्यासंदर्भात अनभिज्ञता दर्शवित केवळ परंपरेने जिल्हा परिषदेकडून त्या तलावाचा लिलाव केला जात असल्याचे त्यांनी सांगितले.हा तलाव आदर्श मत्स्यपालन संस्थेला जि.प.ने लिलावात दिला होता. त्यानंतर अलिकडे तर प्रत्यक्ष लिलाव न करताच केवळ ‘वाटाघाटी’ करून आदर्श मत्स्यपालन संस्थेच्या परवान्याचे नुतनीकरण जिल्हा परिषदेकडून केले जात होते. मात्र प्रत्यक्षात या तलावाच्या जागेवर झुडूपी जंगल होते तेव्हापासून त्याची मालकी वनविभागाची आहे. केंद्र सरकारच्या अखत्यारीतील या वनविभागाने तीन महिन्यांपूर्वीच ती जागा अदानी व्यवस्थापनाला हस्तांतरित केली आहे. त्यामुळे त्या जागेवरील जिल्हा परिषदेचा अधिकार संपुष्टात आला आहे. दरम्यान गेल्या आठवड्यात अदानी व्यवस्थापनाच्या वतीने त्या तलावाची पाळ फोडल्यामुळे त्यातील पाणी वाहून गेले. यामुळे मत्स्यपालन संस्थेच्या संचालकांनी व काही शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला. चुरडी येथील शेतकरी जनजीवन जांभुळकर यांनी सांगितले की, त्या तलावात राख टाकून दुषित पाणी मिळेल ते नको आहे. सरपंच सचिन कराडे यांनी शेतकऱ्यांना त्या तलावातून नियमित पाणी मिळाले पाहिजे असे सांगितले. पाणी गेल्याने शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले. दुसरीकडे मासोळ्या सुद्धा गेल्याने संबंधित मत्स्यपालन संस्थेचे नुकसान झाले. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी त्यांनी केली आहे. परंतू तलाव आम्हाला हस्तांतरित झाल्यामुळे त्या नुकसानासाठी आम्ही जबाबदार नाही, असे अदानी व्यवस्थापनाचे म्हणणे आहे. गुरूवारी जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी तलावाला भेट दिली व शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी सामजिक कार्यकर्ता शामराव झरारीया, मोहन ग्यानचंदानी, देवेंद्र तिवारी, चुरडीचे सरपंच सचिन कराडे व परिसरातील बरेच शेतकरी प्रामुख्याने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)- कागदपत्रे पहा, मग ठरवायासंदर्भात अदानी व्यवस्थापनाचे अधिकारी डी.जे. नागपुरे यांनी सांगितले की, ती जागा केंद्र सरकारकडून अदानी व्यवस्थापनाला मिळाली आहे. त्याचे सर्व कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही ते संबंधितांना दाखवून संभ्रम दूर केला आहे. त्यामुळे मत्स्यपालन संस्थेने आमच्याकडे येण्याऐवजी त्यांना कंत्राट देणाऱ्या जिल्हा परिषदेकडे दाद मागावी.जर वन विभागाने या तलावाची जागा अदानीला हस्तांतरित केली आहे तर जि.प. ने मासोळ्यांसाठी कंत्राट कसे दिले? शेतकऱ्यांना कित्येक वर्षापासून पाणी मिळत होते त्यांना न कळविता जिल्हा परिषदेने त्यांना अंधारात का ठेवले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.दंडात्मक कारवाई करू-मेंढेया प्रकरणी अदानी प्लान्टने केलेल्या नुकसानीसाठी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे जि.प.अध्यक्ष उषाताई मेंढे यांनी संबंधित तलाव पाहणी केल्यानंतर गराडा-चुरडी येथील शेतकऱ्यांसमोर बोलताना सांगितले. मात्र तो तलाव जिल्हा परिषदेच्या मालकीचा नसताना जिल्हा परिषदेला दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार आहे का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.