शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळांना महावितरणचा झटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:26 IST

एकीकडे वाढत्या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन समित्या खिशातून पैसे खर्च करुन गाव सहभागातून शाळांना सुविधा पुरविण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनी मात्र शाळांना सार्वजनिक सेवा बिल (एलटीएक्सबी) आकारून झटका देत आहे.

ठळक मुद्देवाढीव स्थिर आकार : विद्युत पुरवठा खंडित होण्याची वेळ

दिलीप चव्हाण।लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : एकीकडे वाढत्या स्पर्धात्मक युगात आपले अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षक शाळा व्यवस्थापन समित्या खिशातून पैसे खर्च करुन गाव सहभागातून शाळांना सुविधा पुरविण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे वीज वितरण कंपनी मात्र शाळांना सार्वजनिक सेवा बिल (एलटीएक्सबी) आकारून झटका देत आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा केवळ शहरी, खासगी शाळांची मक्तेदारी नसावी यासाठी शासनाने खेडेगावातील आदिवासी बहुल क्षेत्रातील दुर्गम भागातील शाळांचे डिजिटलायझेशन करण्याचा निर्णय घेतला.शेकडो गावामध्ये शिक्षक व गावकऱ्यांच्या प्रयत्नातून विविध सामाजिक संस्थाच्या मदतीने शाळांमध्ये संगणक, प्रोजेक्टर, टेलिव्हीजन यासारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करुन दिल्या. मात्र वीज वितरण कंपनीकडून शाळांना देण्यात येणाºया मासीक बिलात स्थिर आकाराच्या नावाने तब्बल ३५० रुपये वसूल केले जात आहेत. अनेक शाळांची पटसंख्या कमी असते. ग्रामीण भागात १२ ते १४ तास भारनियमन असते. शिक्षक कशी तरी तडजोड करुन विद्यार्थ्याना शिकविण्यासाठी डिजिटल तंत्राचा वापर करतात. मात्र प्रत्यक्षात भारनियमन सुरू असताना स्थिर आकाराच्या नावाखाली दरमहा ३५० रुपये आकारले जात असल्याने कमी पटसंख्या असलेल्या शाळांना बिल भरणे कठीण झाले आहे. आधीच समग्र सर्व शिक्षा अभियान अंतर्गत देण्यात येणाऱ्या अनुदानाला कात्री लावण्यात आल्याने शिक्षकांना स्वखर्चातून वीज बिल भरण्याची वेळ आली आहे.पाच शाळांचा वीज पुरवठा खंडितवीज बिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने गोरेगाव तालुक्यातील पाच शाळांचा वीज पुरवठा खंडीत केल्याची माहिती आहे. परिणामी या पाच शाळा अंधारात आहे. तर प्रोजेक्टरसारख्या महागड्या वस्तू धूळ खात पडल्या असल्याचे चित्र आहे.तालुक्यातीुल १०८ शाळा डिजिटलतालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १०८ शाळा डिजिटल आहेत. या शाळांना पटसंख्येच्या आधारावर शासनाकडून अनुदान प्राप्त होते. १०० च्या वर पटसंख्येच्या शाळांना १५ हजार तर १०० च्या कमी पटसंख्या शाळांना १० हजार रुपये अनुदान दिले जाते. यापूर्वी शिक्षक अनुदान, शाळा अनुदान व देखभाल दुरुस्ती अनुदान बंद करुन शासन पटसंख्येच्या आधारावर शाळांना अनुदान देत आहे.प्राप्त अनुदानातून ही कामेशाळांना मिळणाऱ्या अनुदानातून शालेय साहित्य, शाळा रंगरंगोटी, विद्युत बिल शाळेतील इतर आॅनलाईन कामे करावी लागतात.त्यामुळे प्राप्त होणाऱ्या अनुदानातून नेमका कोणता खर्च करावा असा प्रश्न शाळांसमोर निर्माण झाला आहे.वीज वितरण कंपनीच्या आदेशान्वये स्थिर आकारणी केली जाते. शासकीय सेवा किंवा सार्वजनिक सेवेसाठी ग्राहकांना तेवढे पैसे भरावेच लागतील. एलटीएक्सबचा परिपत्रक असल्याने त्यात बदल करता येत नाही.- ए.डी.भांडारकर,उपकार्यकारी अभियंता गोरेगाव.प्राथमिक शाळा ह्या शासनाच्या अधिनस्त संस्था आहेत. या शाळेतून मुलांंना मोफत शिक्षण दिले जात असताना वीज वितरण कंपनीने बिलात सुट द्यावी किंवा या शाळांना जिल्हा परिषदेने वीज बिल भरावे जेणेकरुन शिक्षकांचा त्रास कमी होईल.-शफीकभाई शेख, कुऱ्हाडी, पालक.

टॅग्स :Schoolशाळाelectricityवीज