लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घटेगाव येथील दुसºया वर्गातील विद्यार्थ्याचा ३ जुलै रोजी दुपारी ३ वाजता अपहरण करण्यात आल्याची माहिती आहे. रौनक गोपाल वैद्य (७) इयत्ता दुसरीचा विद्यार्थी आहे. मध्यान्हाची सुट्टी झाल्यावर तो शाळेच्या परिसरात मित्रांसोबत खेळत असताना एका पांढºया रंगाच्या स्कुटीवर आलेल्या इसमाने त्याचे अपहरण केल्याचे बोलल्या जाते. या संदर्भात गोपाल वैद्य यांनी डुग्गीपार पोलिसाकडे तक्रार केली. डुग्गीपार पोलिसांनी याप्रकरणी माहिती प्राप्त झाली असल्याचे सांगितले. पण वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मुलाची शोध मोहिम सुरु होती.
जि.प. शाळेतून विद्यार्थ्यांचे अपहरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 21:43 IST