कपिल केकत लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लग्न सोहळ्यावर वारेमाप खर्च होत असल्याने कित्येक जण नोंदणी विवाहाला पसंती दर्शवित आहेत. मात्र लग्न परत होणार नसल्याने पूर्ण थाटामाटात करण्याकडे बहुतांश कुटुंबीयांचा कल दिसत असून त्यासाठी वाटेल तो खर्च करतानाही ते दिसतात. यामुळेच सन २०२४ मध्ये फक्त ३२ नोंदणी विवाहांची नोंद जिल्ह्यात आहे. एकंदर 'ना बॅण्डबाजा-ना बारात' अशा लग्नांना कमीच प्रतिसाद असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.
लग्न म्हणजे दोन जीव तसेच दोन कुटुंबांचे मिलन असते. जीवनात एकदाच अनुभवता येणारे हे कार्य असल्यामुळे यात काही उणीव राहू नये अशी दोघा कुटुंबांची इच्छा असते. यामुळेच लग्नाच्या तयारीपासून ते कपडे आणि डेकोरेशनवर कोट्यवधी रुपये खर्च करणारे अनेकजण आहेत. यात मुलीच्या वडिलांवर मात्र जास्त भार पडतो. परंतु, आता बडेजावपणाची विचारधारा बदलत चालली असून, अनेकजण साध्या पद्धतीने विवाह करण्याकडे वळले असल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, सहदुय्यम निबंधक कार्यालयात आता नोंदणी विवाहांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. सन २०२४ मध्ये ३२ नोंदणी विवाह जिल्ह्यात पार पडले आहेत. ही आकडेवारी बघता नोंदणी विवाहांना घेऊन अद्याप कमीच प्रतिसाद दिसून येत आहे.
नोंदणी विवाहाला किती खर्च येतो ?जिल्ह्यातील वर-वधू असल्यास नोटीससाठी १०० रुपये तर विवाह नोंदणीसाठी १५० रुपये लागतात. विवाह नोंदणीसाठी जोडप्याला २५० ते ३०० रुपये खर्च येतो.
काय कागदपत्रे लागतात?वर-वधू यांचा आधारकार्ड, तीन साक्षदार, त्यांच्या ओळखीचा व रहिवासी पुरावा गरजेचा असतो. तसेच नोंदणी विवाहासाठी २५० रुपये खर्च येत असून ऑनलाइन पद्धतीनेसुद्धा पैसे भरले जाऊ शकतात अशी सोय करण्यात आली आहे.
२०२३ मध्ये २८ नोंदणी विवाहआजची पिढी वारेमाप खर्च करून विवाह करण्यापेक्षा सोप्या पद्धतीने कुटुंबीयांच्या उपस्थितीत विवाह करण्यास पसंती दर्शवितात. मात्र कुटुंबीय मानत नसल्याने लग्नावर खर्च केला जातोच. हेच कारण आहे की, सन २०२३ मध्ये दुय्यम निबंधक कार्यालयात फक्त २८ विवाह नोंदणी पद्धतीने पार पडले. तर सन २०२४ मध्ये ही वाढली असून ३४ वर पोहोचल्याचे दिसत आहे.
२०२४ मधील नोंदणी विवाहांचा तक्तामहिना विवाहजानेवारी २फेब्रुवारी ३मार्च १एप्रिल ४मे १जून १जुलै ४ऑगस्ट ४सप्टेंबर २ऑक्टोबर १नोव्हेंबर ६डिसेंबर ३