शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

शासकीय वसतिगृहासाठी अर्ज केला तरच मिळणार 'स्वाधार'चा लाभ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2024 15:16 IST

Gondia : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्यांनाच मिळेल योजनेचा फायदा

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला- मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर थेट जमा करण्यात येते; परंतु स्वाधार योजनेचा लाभ घेण्याअगोदर शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल त्यांनाच 'स्वाधार'चा लाभ घेता येईल. 

वर्ष २०२४-२५ या वर्षासाठी गोंदिया जिल्ह्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे. ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याकरिता संकेतस्थळ सुरू करण्यात आले असून अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करून अर्जाची प्रत सहायक आयुक्त, समाजकल्याण, गोंदिया येथे सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात ८ वसतिगृहे, ८०० हजारांवर जागागोंदिया जिल्ह्यात एकूण ८ शासकीय मुला मुलींची वसतिगृहे आहेत. त्यापैकी एक वसतिगृह नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांचे आहे. सर्व मिळून ८०० जागा आहेत.

व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी ३० ऑगस्टची मुदतअनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी व्यावसायिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी अर्ज करण्याची मुदत ३० ऑगस्टपर्यंत देण्यात आली आहे.

अधिक माहितीसाठी सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयामागे गोंदिया येथे संपर्क साधावा.

अर्ज केला तरच मिळेल लाभशासकीय वसतिगृहात ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, त्यांनाच स्वाधार योजनेचा लाभ मिळतो. त्यामुळे स्वाधार चा लाभ घ्यायचा असेल तर वसतिगृहासाठी अर्ज करावा लागेल.

महाआयटी पोर्टलवर करा अर्जवर्ष २०२४-२५ या वर्षासाठी https://hmas.mahait.org या पोर्टलद्वारे नागपूर जिल्ह्यात MahalT शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज भरता येणार आहे.

"स्वाधार योजनेचा लाभ घेण्याअगोदर शासकीय वसतिगृहाच्या प्रवेशासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. कारण ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नसेल त्यांनाच स्वाधार' चा लाभ घेतो येईल."- विनोद मोहतुरे, विशेष समाज कल्याणचे सहायक आयुक्त गोंदिया, 

टॅग्स :gondiya-acगोंदिया