शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हीच सांगा साहेब उर्वरित धानाची विक्री करायची कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2021 05:00 IST

जिल्ह्यातील धानाचे सरासरी उत्पादन हे प्रती एकर १८ क्विंटलच्या वर आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळण्याची हमी असल्याने शेतकरी या केंद्रावरच धानाची विक्री करतात. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव घोषीत केला आहे. एवढा दर बाहेर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करतात. पण यंदा शासनाने एकरी ११ क्विंटलचा निकष लावला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हा निकष लावून शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : खरिप हंगामातील शासकीय धान खरेदीला सुरुवात झाली असली तरी शासनाच्या धोरणामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. यंदा शासनाने शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी प्रति एकर ११ क्विंटल धानाची मर्यादा निश्चित केली आहे. मात्र प्रति एकरी धानाचे उत्पादन हे १८ क्विंटलच्या वर असल्याने उर्वरित धानाची विक्री करायची कुठे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.जिल्ह्यात यंदा खरिप हंगामात १ लाख ९८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली होती. जिल्ह्यात २ लाख ५० हजार खातेदार शेतकरी आहे. शेती हाच या भागातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय आहे. मागील सात आठ वर्षांपासून शेतकरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेती करीत असल्याने धानाच्या एकरी उत्पादनात वाढ झाली आहे. काही शेतकरी एकरी २० ते २२ क्विंटल धानाचे उत्पादन घेतात. जिल्ह्यातील धानाचे सरासरी उत्पादन हे प्रती एकर १८ क्विंटलच्या वर आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर हमीभाव मिळण्याची हमी असल्याने शेतकरी या केंद्रावरच धानाची विक्री करतात. यंदा धानाला १९४० रुपये हमीभाव घोषीत केला आहे. एवढा दर बाहेर मिळत नसल्याने शेतकरी शासकीय धान खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करतात. पण यंदा शासनाने एकरी ११ क्विंटलचा निकष लावला आहे. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत आहे. हा निकष लावून शेतकऱ्यांची थट्टाच केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. ही मर्यादा लावताना शासनाने कुठलाही विचार केला नाही त्यामुळे उर्वरित धानाची विक्री खासगी व्यापाऱ्यांना करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे शासनाने ही मर्यादा किमान १८ क्विंटल करावी अशी मागणी केली शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना पत्र- जिल्ह्यातील बहुतांश शेतकरी हे शासकीय धान खरेदी केंद्रावरच धानाची विक्री करतात. धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाकडून बोनस देखील मिळतो. त्यामुळेच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विक्री करण्याची वेळ येऊ नये यासाठी धान खरेदीची एकरी मर्यादा १८ क्विंटल करण्याची मागणी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पाठविलेल्या पत्रातून आ. विनोद अग्रवाल यांनी केली आहे.

धान खरेदी केंद्राची प्रतीक्षा कायम- जिल्ह्यात यंदा खरिप हंगामासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने १४९ केंद्रांना मंजुरी दिली आहे. पण यापैकी ५० ते ६० धान खरेदी केंद्र सुरु झाले आहे. उर्वरित धान खरेदी केंद्र सुरु झाले नसल्याने शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्यामुळे यावर त्वरित तोडगा काढण्याची गरज आहे.  

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्डFarmerशेतकरी