तिरोडा : लायन्स क्लब इंटरनॅशनल सेवा सप्ताहच्या माध्यमातून लॉयन्स क्लब तिरोडाच्या वतीने विहिरगाव येथे स्थानिक जिल्हा परिषद विद्यालयातील विद्यार्थ्यांची शांतता रॅली शाळेपासून काढण्यात आली. ती रॅली गांधी पुतळ्यापर्यंत नेण्यात आली.महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून पूजन करण्यात आले. जिल्हा परिषद विद्यालयाच्या प्रांगणात लॉयन्स क्लबच्या चमूने व विद्यार्थ्यांनी बाल स्वच्छता अभियान राबविला. या विद्यालयाच्या प्रांगणात लालबहादूर शास्त्री व महात्मा गांधीच्या प्रतिमेस, तसेच संत गाडगेबाबाच्या प्रतिमेस चमूच्या विविध सदस्यांसोबत क्लबचे अध्यक्ष प्रेमकुमार रहांगडाले व उमा हारोडे यांनी माल्यार्पण केले. संचालन अॅड. प्रणय भांडारकर यांनी केले. याप्रसंगी प्रेमकुमार रहांगडाले यांनी बाल स्वच्छता मोहीमेवर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.याप्रसंगी लायन्स क्लबच्या वतीने प्रेमकुमार रहांगडाले (अध्यक्ष), अॅड. प्रणय भांडारकर (सचिव) राजू बुराडे (कोषाध्यक्ष), उमा हारोडे, अमृत देशपांडे, अशोक मिश्रा, प्रकाश गेडाम, प्रकाश ग्यानचंदानी, अॅड. अजय यादव, सुशील बैस, पवन वासनिक, गणेश बघेले, स्वानंद पारधी, संजीव कोलते, सोनाली देशपांडे, किरण यादव, कल्पना हारोडे, स्रेहल भांडारकर, सुप्रिया वासनिक, कृपा कोलते, मोहन बचवानी, विजय येरपुडे, अनुप बोपचे, संगिता बोपचे, अर्चना बुराडे, आराधना मिश्रा, शितल बैस व आशा रहांगडाले उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सोनवाने व इतर शिक्षकांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
विहीरगाव येथे विश्वशांती रॅली
By admin | Updated: October 18, 2015 02:10 IST