गोंदिया : विक्र ीकर विभागाच्या वतीने नुकतेच गोंदिया येथे करदात्यांना दिलासा देणाऱ्या शासनाच्या योजनांबद्दल माहिती देण्यासाठी अग्रसेन भवन येथे चर्चासत्र पार पडले. अध्यक्षस्थानी विक्र ीकर उपायुक्त शीला मेश्राम होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा व्यापारी संघाचे अध्यक्ष राजेंद्रसिंह बग्गा व संघटनांचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती. मेश्राम यांनी मार्गदर्शनातून सेटलमेंट आॅफ डिस्पुटेड एक्ट २०१६ विषयी माहिती दिली. तसेच या योजनेअंतर्गत व्हॅट व व्हॅट संलग्न सर्व कायद्यांतर्गत प्रलंबित थकबाकी असल्यास व प्रकरण अपिलात असल्यास फक्त कर व २५ टक्के व्याज भरावे लागेल, उर्विरत ७५ टक्के व्याज व १०० टक्के दंडाची सूट मिळेल, असे सांगितले. या दोन्ही योजना ३० सप्टेंबर २०१६ पर्यंतच लागू असल्याने पात्र व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. बग्गा यांनी ही योजना चांगली असून जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.व्यवसाय कर अधिकारी व्ही.आर. देवगडे यांनी व्यवसाय कर अभय योजना २०१६ बाबत माहिती दिली. या योजनेंतर्गत व्यवसाय केव्हाही सुरु केला असला तरी फक्त वर्ष २०१३-१४ पासून आतापर्यंतच्या फक्त कराची रक्कमच भरावी लागेल. वर्ष २०१३-१४ आधीचे कर, व्याज तसेच दंडाची १०० टक्के सूट मिळेल. ही योजना संपताच कर वसूलीची धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याने अनोंदीत व्यक्तीने त्वरित सदर योजनेचा लाभ घेवून नोंदणी करावी व कर वसूलीची सक्त कार्यवाही टाळावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी व्यापारी बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर देवून विक्र ीकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांचे समाधान केले. (प्रतिनिधी )
विक्र ीकर विभागाच्या कार्यशाळेची सांगता
By admin | Updated: August 27, 2016 00:14 IST