शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

केशोरी-वडेगाव रस्त्याचे काम त्वरित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही जिल्हा मार्गाचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या कंत्राटदाराने डांबरीकरण केले, त्या कंत्राटदाराची देखभाल करण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षांपर्यंत स्वीकारली आहे. परंतु त्या कंत्राटदाराचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे सदर रस्त्याची दुरवस्था अनेक महिन्यांपासून कायम आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा केशोरी ते वडेगाव (बंध्या), केशोरी ते महागाव ही दोन्ही जिल्हा मार्ग अत्यंत खराब झाला आहे. केशोरी येथील तीन वर्षांपासून मंजूर असलेला बायपास रस्ता प्रशासनाच्या व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे प्रलंबित पडला आहे. त्यामुळे जड वाहने गावातून जात आहेत. या प्रकारामुळे येथील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळा लागण्यापूर्वी केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही रस्त्यांसह केशोरी बायपास रस्त्याची कामे सुरू करावी, अन्यथा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा चेतन दहीकर यांनी दिला आहे. केशोरी ते वडेगाव (बंध्या) आणि केशोरी ते महागाव या दोन्ही जिल्हा मार्गाचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्या कंत्राटदाराने डांबरीकरण केले, त्या कंत्राटदाराची देखभाल करण्याची जबाबदारी पुढील पाच वर्षांपर्यंत स्वीकारली आहे. परंतु त्या कंत्राटदाराचे या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष नाही. त्यामुळे सदर रस्त्याची दुरवस्था अनेक महिन्यांपासून कायम आहे. संबंधित कंत्राटदार, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी या रस्ता दुरुस्तीसाठी एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहत आहेत काय? असा संतप्त सवाल शिवसेना शाखा केशोरीच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे. दोन्ही रस्त्यांना पडलेली खड्डे चुकविताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी तर या मार्गाने प्रवास करणे अधिकच जीवघेणे ठरू पाहात आहे. मात्र, या रस्ता दुरुस्तीकडे सातत्याने अक्षम्य दुर्लक्ष केले जात आहे.

 अपघातांच्या संख्येत वाढ 

- या रस्त्याच्या प्रवासादरम्यान लहान-मोठी अपघात घडून अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र, अजूनही प्रशासनाला जाग आली नाही. केशोरी बायपास रस्ता मंजुरीला तीन वर्षे लोटूनही रस्ता निर्मितीच्या कामाला सुरुवात झाली नाही. त्यामुळे सर्व वाहने गावाच्या अरुंद असलेल्या रस्त्याने मध्य भागातून जात असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. या रस्त्याने रात्रंदिवस वाहने धावत असल्यामुळे येथील नागरिकांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात- केशोरी ते वडेगाव (बंध्या), केशोरी ते महागाव या दोन्ही रस्त्यांबरोबर केशोरी बायपास रस्ता निर्मितीची कामे करावी, अन्यथा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि संबंधित कंत्राटदाराच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शाखा केशोरीच्या वतीने माजी शिवसेना तालुका प्रमुख चेतन दहीकर यांनी दिला आहे.

 

टॅग्स :highwayमहामार्ग