लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या संपामुळे जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमाने सुरू बालकांच्या विकास प्रकल्पाचे काम ठप्प पडल्याचे चित्र आहे.या विभागातील अधिकाºयांच्या कमतरतेमुळे संपूर्ण कामे थंडबस्त्यात आहे. सध्या साहायक खंड विकास अधिकाºयांकडे एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाची जबाबदारी सोपविली आहे. मात्र त्यांच्याकडे इतरही कामे असल्याने त्यांची देखील तारांबळ होत असल्याचे चित्र आहे.गोंदिया जिल्ह्यात आठ तालुके आहेत. गोंदिया तालुक्यात दोन एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय आहेत. उर्वरित तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक प्रकल्प कार्यालय आहे. एकूण ९ प्रकल्प कार्यालये गोंदिया जिल्ह्यात कार्यरत आहेत. परंतु जिल्ह्यात केवळ चार अधिकारीच एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयांत कार्यरत आहेत. पाच ठिकाण रिक्त आहेत. या ठिकाणी अतिरिक्त प्रभार सदर चार प्रकल्प अधिकाºयांना सोपविण्यात आला आहे. एका प्रकल्प अधिकाºयास दोन-दोन ठिकाणी काम करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यामुळे सालेकसा येथील प्रकल्प अधिकाºयाला गोंदियाच्या प्रकल्प क्रमांक एकची अतिरिक्त सोपविली आहे. गोरेगावच्या प्रकल्प अधिकाºयांना गोंदियाच्या दुसºया प्रकल्पाचा प्रभार आहे. विशेष म्हणजे सदर चारही एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकाºयांना दीड महिन्याच्या प्रशिक्षणावर पाठविण्यात आले आहे. एकतर आधीच अधिकाºयांची कमतरता आहे. तर काही अधिकारी प्रशिक्षणासाठी गेले आहेत. त्यामुळे या विभागाचे सर्व कामकाज खोळंबल्याचे चित्र आहे.मागील दिवसांत या विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी पारखेसुद्धा रजेवर गेले होते. संपूर्ण विभागातील कामकाज ठप्प असल्याचे चित्र आहे. सध्या साहायक खंडविकास अधिकारी यांना एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयाचा पदभार सोपविण्यात आला आहे. परंतु काही पंचायत समित्यांमध्ये साहायक खंड विकास अधिकारीच खंडविकास अधिकाºयांचे काम करीत आहेत.सद्यस्थितीत सहायक खंडविकास अधिकाºयांना प्रकल्प अधिकाºयांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे कुठलीही कामे ठप्प नसून ती सुरळीतपणे सुरू आहेत.-दीपक ढोरे,विस्तार अधिकारी,एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, जि.प.गोंदिया.
बाल विकास प्रकल्पाचे कामकाज ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 21:07 IST
अंगणवाडी सेविका व मदतनिस यांच्या संपामुळे जिल्हा परिषदेच्या बाल विकास प्रकल्प कार्यालयाच्या माध्यमाने सुरू बालकांच्या विकास प्रकल्पाचे काम ठप्प पडल्याचे चित्र आहे.
बाल विकास प्रकल्पाचे कामकाज ठप्प
ठळक मुद्देजिल्हा परिषद : चार प्रकल्प अधिकाºयांवर नऊ कार्यालयांचा भार