परसवाडा : कोरोना संकटाच्या काळातही महिलांनी घराघरात जाऊन आरोग्यविषयक सर्वेक्षण करून जनजागृतीचे कार्य केले. त्यामुळेच कोरोनावर मात करण्यात बऱ्याच प्रमाणात यश आले आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून उद्योग, व्यवसाय, शेती, सामाजिक विकासात महिला सक्षमीकरणासाठी पुढे येत आहेत. गावात दारूबंदी असो की अवैध व्यवसाय, आळा घालण्यासाठी महिला वर्ग पुढे येत आहे. त्यामुळे सामाजिक विकासात महिलांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रतिपादन ॲड. माधुरी रहांगडाले यांनी केले.
तालुक्यातील दवनीवाडा येथे आयोजित महिला मेळाव्यात मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. मेळाव्याचे उद्घाटन माजी जि.प. सभापती छाया दसरे यांनी केले. दीप प्रज्वलन सामािजक कार्यकर्त्या प्रा. सविता बेदरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ॲड. हेमलता पतेह, सविता तुरकर, योजना कोतवाल, पूजा तिवारी, संगीता घोष, गंगासागर मंडले, डॉ. निकिता लांजेवार, डॉ. सैफाली वैद्य, डॉ. रिना रोकडे, डॉ. प्रीती कटरे, डॉ. शीतल रामावे, भावना कदम, सुजाता बहेकार, बरखा कनौजिया, शशी फुंडे, प्रेमा शर्मा, माधुरी हरिणखेडे, स्नेहा गौतम, शिखा पिपरेवार, उपकार्यकारी अभियंता कल्पना राऊत, मेश्राम, ममता दमाहे, दीपिका पिपरेवार, सुप्रिया वासनिक, रजनी सोयाम, अल्का पारधी, लता टेंभरे, लता जमईकर, दमयंती लिल्हारे, दमयंती भोयर उपस्थित होते. यावेळी धनलाल ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. माता सरस्वती, क्रांतिज्योती फुले, महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या छायाचित्राला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी गावातील ज्येष्ठ महिलांचा व कोरोना काळात सेवा देणाऱ्या आशासेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आरोग्य सेविका, शिक्षिका, महिला पोलीस शिपाई, सामाजिक कार्यकर्ते, बचत गटातील महिलांचा कोरोना योद्ध्यांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला. सविता बेदरकर यांनी महिलांवर, लहान मुलींवर होणाऱ्या अत्याचाराला प्रतिबंध लावण्यासाठी कठोर पाऊल उचलण्याची गरज असल्याचे सांगितले. कार्यक्रमासाठी सविता पटले, वैशाली बाळणे, कृष्णादेवी माहुले, भुरी उके, आशा खोब्रागडे, विनेश्वरी, खोब्रागडे, बी.सी. राऊत, माया अटरे, अंजू लांजेवार, संगीता लिल्हारे, रजनी सोलंकी यांनी सहकार्य केले.