लोकमत न्यूज नेटवर्कराजोली : ‘लॉकडाऊन’मुळे दैनंदिन मजूरीचे काम करुन उदरनिर्वाह करणाऱ्या विधवा, एकल महिला, भूमीहिन मजुरांसमोर स्वत:च्या कुटुंबाच्या पालन पोषणाचे आवाहन निर्माण झाले आहे. अशात संविधान प्रभाग संघ व ग्रामसंघाच्या ३१६ गरजूंना धान्य व जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला.महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केशोरी येथे स्थापित संविधान प्रभाग संघ व परिसरातील विश्वास ग्रामसंघ (केशोरी), तिरंगा ग्रामसंघ (गार्डनपुर), एकता ग्रामसंघ (तुकुम-साय.), आदर्श श्रमदिशेला व इतर सहा ग्रामसंघांनी ३१६ गरजूंना सामाजिक बांधीलकी जोपासत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. ग्राम संघातील महिला बीआरजीएफ निधिचा वापर करुन मोफत धान्य पुरवित आहेत.तालुका अभियान व्यवस्थापक रेशीम नेवारे, प्रभाग समन्वयक प्रविण रामटेके, प्रभाग अध्यक्ष प्रतिभा शेंडे, सचिव निराशा शेंडे, व्यवस्थापक पुष्पा कराडे यांच्या मार्गदर्शनात सदर कार्य सुरु असून नागरिकांना सचेत करण्याच्या उद्देशातून काही समुहातील महिलांनी कोरोना विषयक जनजागृती करण्याकरीता भीतीलेखन व भीतीचित्रांचा आधार घेतला आहे.
मदतीसाठी महिलांचा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2020 05:00 IST
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत केशोरी येथे स्थापित संविधान प्रभाग संघ व परिसरातील विश्वास ग्रामसंघ (केशोरी), तिरंगा ग्रामसंघ (गार्डनपुर), एकता ग्रामसंघ (तुकुम-साय.), आदर्श श्रमदिशेला व इतर सहा ग्रामसंघांनी ३१६ गरजूंना सामाजिक बांधीलकी जोपासत धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले जात आहे. ग्राम संघातील महिला बीआरजीएफ निधिचा वापर करुन मोफत धान्य पुरवित आहेत.
मदतीसाठी महिलांचा पुढाकार
ठळक मुद्देसंविधान प्रभागसंघ व ग्रामसंघ : ३१६ गरजूंना केली मदत