तिरोडा : देश व राज्यावर कोरोनाची आपत्ती ओढावली होती. या आपत्तीच्या काळातही महिलांनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळेच आपण कोरोनाच्या लढ्यात यशस्वी ठरलो. त्याचप्रमाणे, ग्रामपंचायतमध्ये ५० टक्के आरक्षणाच्या व्यतिरिक्तही अनेक महिला निवडून आल्या आहेत. महिलांनी प्रगतीची कास धरून गाव विकासात पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन माजी आमदार राजेंद्र जैन यांनी केले.
तालुक्यातील ग्राम सरांडी येथे आयोजित नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य व कोरोना योद्धाचा सत्कार समारोह तथा महिला मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर होत्या. याप्रसंगी युवानेते रविकांत बोपचे, राकाँ. दलित आघाडीचे जिल्हाध्यक्ष मनोज डोंगरे, तालुकाध्यक्ष प्रेम रहांगडाले प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे, कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणाऱ्या महिला योद्धांना सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला प्रेमसागर धावडे, जया धावडे, माणिक वाणी, नत्थू गजभिये, रामकृष्ण लांजेवार, शिशुपाल पटले, डॉ.संगिता भोयर, सरिता पटले, हुबेकर, मीनाक्षी डोंगरे, किशोर कुंभरे, राजेश टेकाम, अभय पाटील, कल्पना मलेवार, संतोष लिल्हारे, दिगंबर पाटील, उर्मिला धावडे, अरुण कडव, दीपमाला टेंभेकर यांच्यासह हजारोंच्या संख्येने परिसरातील नागरिक व महिला उपस्थित होत्या.