लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सर्वत्र ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिणामी उद्योग धंदे सर्वच ठप्प आहे. रोजगाराची कुठलीच साधने उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात महिलांच्या हाताला काम नाही.अशात तालुक्यातील ग्राम झरपडा येथील बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत गृह उद्योग सुरू करुन महिलांच्या हाताला काम उपलब्ध करुन देत ‘लॉकडाऊन’चा सदुपयोग केला आहे. ‘लॉकडाऊन’ आणि संचारबंदीमुळे सर्व लोकांना घरीच राहावे लागत आहे.गावातील महिला मजुरवर्गाच्या हाताला सध्या काम नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे.गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढे येत महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला. यातूनच घरात राहून महिलांना पापड तयार करण्याचे काम उपलब्ध करुन दिले.त्यामुळे‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना घरीच राहून काम करता येणे शक्य झाले व त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा मिटला आहे. महिला बचत गटाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
महिलांनी केला ‘लॉकडाऊन’चा सदुपयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 05:00 IST
गावातील महिला बचत गटाच्या सदस्यांनी पुढे येत महिलांना गृह उद्योगाच्या माध्यमातून रोजगार कसा उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न केला. यातूनच घरात राहून महिलांना पापड तयार करण्याचे काम उपलब्ध करुन दिले. त्यामुळे‘लॉकडाऊन’च्या काळात महिलांना घरीच राहून काम करता येणे शक्य झाले व त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुद्धा मिटला आहे. महिला बचत गटाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल गावकऱ्यांकडून त्यांचे कौतुक केले जात आहे.
महिलांनी केला ‘लॉकडाऊन’चा सदुपयोग
ठळक मुद्देगृहउद्योगाला दिली चालना : महिलांना मिळाला रोजगार, बचत गट