शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

स्वयंसहायता बचत गटाच्या महिलांनी फुलविली टरबूज शेती

By admin | Updated: April 18, 2017 01:12 IST

ध्यास घेतला तर काहीही करता येते याचे मुर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम आसलपाणी येथील जय माँ लक्ष्मी स्वयं सहायता महिला बचत गटातील महिलांनी दिले आहे.

स्वयंरोजगार : आता मत्स्य शेती करण्याचे नियोजन गोंदिया : ध्यास घेतला तर काहीही करता येते याचे मुर्त उदाहरण तालुक्यातील ग्राम आसलपाणी येथील जय माँ लक्ष्मी स्वयं सहायता महिला बचत गटातील महिलांनी दिले आहे. बचतगटाच्या माध्यमातून एकत्र आलेल्या या महिलांनी टरबूजाची शेती पिकवून मेहनत केल्यास काहीच अशक्य नसल्याचे दाखवून दिले आहे. जय माँ लक्ष्मी स्वयं सहा. महिला बचत गटाची स्थापना स्वर्ण जयंती ग्राम स्वयंरोजगार योजनेअंतर्गत २००६ मध्ये झाली होती. सदर गट विस्कळीत व अनियंत्रित झाले होते. मात्र गट समन्वयक जे.एम.बिसेन यांनी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटाचे सन २०१४ मध्ये पूनर्जीवन केले. बचत गटातील १२ महिला कुटूंबाचे कौशल्य व त्यांचेकडील उपलब्ध संसाधनांचा विचार करून आपल्या गावातील कसाऱ्या तलावाच्या पोट जमीनीवर बचतगटाच्या महिलांनी टरबूज शेती करण्याचे ठरविले.गावातील मासेमार संस्थेने लिलावाद्वारे २० हजार रुपयांना घेतलेले तलाव बचतगटाच्या महिलांनी आपल्या हिस्याचे भाडे भरून टरबूज शेती करण्यासाठी घेतले. तलावाच्या भाड्याची रक्कम भरण्यासाठी गटातील जमा रकमेचा अंतर्गत कर्ज म्हणून उपयोग केला. बचतगटाच्या ११ महिलांनी भाड्याने (ठेक्याने) असलेली जमीन टरबूज शेती लावण्याकरीता आपसात वाटून घेतली. प्रत्येकी अर्धा एकरमध्ये टरबूजवाडी व सोबत काकडी लावलेली आहे. टरबूज बीची पेरणी माहे डिसेंबर २०१६ मध्ये करण्यात आली व मार्च शेवटी व एप्रिलमध्ये फळे विकण्यास सुरूवात झाली. बचतगटाच्या महिलांनी केलेली टरबूज शेती बघून मन प्रसन्न होते. महिलांनी केलेल्या कामाचे चीज झाल्याचे वाटते सदर टरबूज शेतीतून प्रत्येक सहभागी कुटूंबाला खर्च वजा जाता ३० हजार रुपयापर्यंत निव्वळ नफा मिळण्याचा अंदाज आहे. म्हणजे ११ सदस्यांचे एकूण उत्पन्न तीन लाख ३० हजार होणार आहे. या उत्पन्नाचा या बचतगटाच्या गरीब कुटूंबाच्या उपजीवीकेच्या दृष्टीकोनातून त्यांच्या आवश्यक गरजा भागविण्यासाठी फार मोलाचा आधार होणार आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत आसलपाणीच्या जय मा लक्ष्मी स्वयं सहा. महिला बचत नाविण्यपूर्ण टरबूज शेती करून उत्पन्नाचे नविन स्त्रोत तयार करणारे गोरेगाव तालुक्यातील प्रथम व एकमेव गट आहे. सदर गटाच्या अध्यक्ष उषा नाईक, उपाध्यक्ष निलवंता वट्टी व सचिव पुस्तकला राऊत आहेत. यापुढे या बचतगटातील कुटूंबाचे कौशल्य लक्षात घेवून गटाद्वारे गट समन्वयक बिसेन यांच्या मार्गदर्शनात पूर्ण अभ्यास व नियोजन करून याच तलावामधील पाण्यामध्ये मत्स्य शेती करण्याचे नियोजन आहे.जेणेकरून त्यांना अतिरीक्त उत्पन्नाचे स्त्रोत निर्माण होवू शकेल. (तालुका प्रतिनिधी)