शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

तस्करांशी सामना करतात शस्त्रांविनाच

By admin | Updated: August 14, 2015 02:02 IST

जिल्ह्यात वन विभाग गोंदिया अंतर्गत एकूण २५२६ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. यापैकी काही क्षेत्र नक्षल प्रभावित आहेत.

पिस्तुल व रायफल नाही : वन विभागाची शस्त्रे पोलीस शस्त्रागारातलोकमत विशेषदेवानंद शहारे गोंदियाजिल्ह्यात वन विभाग गोंदिया अंतर्गत एकूण २५२६ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. यापैकी काही क्षेत्र नक्षल प्रभावित आहेत. वनरक्षकांना शस्त्र जवळ बाळगण्याची परवानगी असूनही स्वत:च्या व शस्त्रांच्या रक्षणासाठी ते शस्त्रे वनात नेत नाही. त्यामुळे वन विभागाची सर्व शस्त्रे पोलीस मुख्यालयात असलेल्या जिल्हास्तरीय शस्त्रागारात ठेवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे वनांचे संरक्षण शस्त्रांशिवाय होत आहे.जिल्ह्यात वन विभाग व वन्यजीव विभागांतर्गत मोडणाऱ्या क्षेत्रात वनांच्या संरक्षणासाठी वनरक्षकांची पदे कार्यरत आहेत. वनरक्षकांना कमीत कमी वर्षातून एकदा शस्त्रांचे प्रशिक्षण दिले जाते. या प्रशिक्षणाच्या वेळीच सदर शस्त्रे काढली जातात. वन विभागाचे स्वत:चे शस्त्रे असून ते पोलीस विभागाच्या शस्त्रागारात आहेत. वन विभागाकडे त्या शस्त्रांची देखभाल करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ किंवा संत्री नाही. त्यामुळेच वन विभागाची शस्त्रे पोलीस विभागाच्या शस्त्रागारात ठेवण्यात आली असून त्यात पिस्तूल व रायफल यांचा समावेश आहे. तेथे सर्व शस्त्रांची देखभाल केली जाते.पोलीस समुहाने फिरतो किंवा समुहात राहून कारवाई केली जाते. मात्र वनरक्षक वनात एकटा-दुकटाच फिरत असतो. एकटा व्यक्ती शस्त्र सांभाळू शकत नाही. शिवाय नक्षलवाद्यांकडून ते शस्त्र बळकावण्याचीच भीती अधिक असते. त्यामुळे वनरक्षकांना परवानगी असूनही स्वत:च्या व शस्त्रांच्या रक्षणासाठी ते वनात शस्त्रे नेत नाही, असे वन विभागातून सांगण्यात आले आहे. मात्र वनरक्षकावर एखाद्या हिंस्त्र पशूने हल्ला केला किंवा तो नक्षलवाद्यांच्या तावडीत सापडला तर त्याने काय करावे? असा प्रश्न त्यांच्यासमोर उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. वनरक्षक जरी वनात शस्त्रे घेवून जात नसले तरी मात्र एखादी कारवाई करावयाची असल्यास शस्त्र घेवून जाता येते. त्यासाठी पोलीस विभागाला आधी माहिती देवून पोलिसांच्या सहकार्यानेच वनरक्षक कारवाई करू शकतात. त्यासाठी परवानगी घ्यावी लागते. शिवाय आत्मसंरक्षणासाठी शस्त्रांचा वापर केला जावू शकतो, असे वनविभागाच्या सूत्रांनी सांगितले आहे. मात्र शस्त्राविना वनात असणाऱ्या वनरक्षकांना दहशतीत जीवन जगावे लागत असणार, ही बाब नाकारली जावू शकत नाही. (प्रतिनिधी)गोंदिया वन विभागातील वनांची विभागणीजिल्ह्यात जुणे आरक्षित वन २८१.६१७४ चौकिमी, नवीन आरक्षित वन ४४६.४०८४ चौकिमी, संरक्षित वने ६८२.७४९८ चौकिमी, गोसे संरक्षित वने २९.९५६१ चौकिमी, झुडपी जंगले २१९.७०२० चौकिमी, अवर्गीकृत वन ७२.४०५९ चौकिमी व कंपेनसेटरी अ‍ॅफफॉरेस्टेशन क्षेत्र ०.२५१२ चौकिमी असे एकूण १७३३.०९०८ चौकिमी गोंदिया वन विभागाचे क्षेत्र आहे. तर वन्यजीव विभागाच्या नागझिरा सेंच्युरी १५३.६६३० चौकिमी, नवीन नागझिरा अभयारण्य ७२.८७१६ चौकिमी, नवेगाव राष्ट्रीय उद्यान १२९.५५२० चौकिमी व नवेगाव अभयारण्य १२२.७५६७ चौकिमी असे एकूण ४७८.८४३३ चौकिमी वन्यजीव विभागाचे क्षेत्र आहे. तर एफडीसीएमचे क्षेत्र ३१४.९२९६ चौकिमी आहे. वन विभागासह इतर सर्वच विभागांची शस्त्रे जिल्हास्तरावर एकाच शस्त्रागारात सुरक्षित राहत असतील तर काय बिघडते. शस्त्रांना सुरक्षित ठेवण्यासाठी किंवा देखभालीसाठी अनेक विभागांकडे तशा कर्मचाऱ्यांची उपलब्धता नाही. त्यामुळे जिल्हास्तरावर शस्त्रागारात वन विभागाची शस्त्रेसुद्धा सुरक्षित आहेत.’’-डॉ.जितेंद्र रामगावकर,उपवनसंरक्षक, वन विभाग, गोंदिया.