लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : केंद्रातील मोदी सरकार हे शेतकरी विरोधी असून प्रचंड विरोधानंतरही केवळ बहुमताच्या जोरावर तीन कृषी विषयक विधेयक पारित केले. या विधेयकामुळे शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा विरोध देशभरातील शेतकरी करीत आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कठीबध्द असून कुठल्याही संकटात आपण शेतकऱ्यांच्या पाठीशी खंभीरपणे उभे राहू अशी ग्वाही खा. प्रफुल्ल पटेल यांनी दिली.गोरेगाव तालुक्यात विविध ठिकाणी आयोजित जनसंवाद व कार्यकर्ता बैठकीत मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या वेळी माजी खासदार डाॅ. खुशाल बोपचे, जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, रविकांत बोपचे, केवल बघेले, डाॅ. श्रीप्रकाश रहांगडाले, महेंद्र चौधरी, बाबा बहेकार,आनंद बडोले, कल्पना बहेकार, डिलेश्वरी तिरेले, राजेश येरणे, खुशाल वैद्य, भोजू चव्हाण, संजू अगळे, छाया वरकडे, अशोक बघेले, गेंदलाल गौतम, महादेव राणे, बंडू पटले, बी.जी. बघेले, महेंद्र कटरे, गोवर्धन चौधरी, कन्हया कोल्हे, होमेंद्र खोब्रागडे, केशव पटले, खिरेकर, मनोहर ठाकरे उपस्थित होते. खा. पटेल म्हणाले राज्यात आमचे सरकार आल्यास शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ७०० रुपये बोनस देण्याची घोषणा केली होती त्याची पुर्तत: केली आहे. शेतकरी समृध्द व्हावा यासाठी आपले प्रयत्न सुरु असून जिल्ह्यातील रखडलेले सिंचन प्रकल्प सुध्दा लवकरच मार्गी लावण्यात येतील असे सांगितले. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झाल्याने धान खरेदीस विलंब होत होता. खा. पटेल यांच्या निर्देशामुळे कवलेवाडा, कुऱ्हाडी, दवडीपार येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. कवलेवाडा व कुऱ्हाडी येथे धान खरेंद्री केंद्राचे उद्घाटन खा. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2020 05:00 IST
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सर्व कार्यकर्त्यांनी सज्ज राहावे. तसेच पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचे कार्य करावे असे सांगितले. गोरेगांव तालुक्यासाठी मंजूर करण्यात आलेले शासकीय धान खरीदी केंद्र सुरु करण्यास उशीर झाल्याने धान खरेदीस विलंब होत होता. खा. पटेल यांच्या निर्देशामुळे कवलेवाडा, कुऱ्हाडी, दवडीपार येथे धान खरेदी केंद्र सुरु करण्यात आले. कवलेवाडा व कुऱ्हाडी येथे धान खरेंद्री केंद्राचे उद्घाटन खा. पटेल यांच्या हस्ते करण्यात आले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी सदैव उभे राहणार
ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कवलेवाडा, कुऱ्हाडी येथे केंद्राचे उद्घघाटन