शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
2
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
3
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
4
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
5
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
6
नवी जबाबदारी मिळताच नवाब मलिक अ‍ॅक्शन मोडवर; बैठका घेत मुंबई महापालिका निवडणूक कामाला लागले
7
Independence Day 2025: "वंद्य वंदे मातरम्...", ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या सलील कुलकर्णींनी दिल्या सुरेल शुभेच्छा
8
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
9
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
10
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
11
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
12
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
13
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
14
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
15
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
16
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
17
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
18
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
20
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक

विकास शुल्काच्या नावावर दरवर्षी वसुली कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 21:03 IST

शहरातील काही खासगी नामाकिंत इंग्रजी शाळा व्यवस्थापनाकडून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी विकास शुल्काच्या नावावर शुल्क वसुल केले जाते. मात्र याची कुठलीही रितसर पावती पालकांना दिली जात नाही.

ठळक मुद्देखासगी शाळांकडून लूट : पालक उतरणार रस्त्यावर, सरकारी शाळांचा दर्जा सुधारा, शुल्कवाढीला चाप लावण्याची गरज

अंकुश गुंडावार।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील काही खासगी नामाकिंत इंग्रजी शाळा व्यवस्थापनाकडून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षी विकास शुल्काच्या नावावर शुल्क वसुल केले जाते. मात्र याची कुठलीही रितसर पावती पालकांना दिली जात नाही. पालक सुध्दा आपल्या पाल्याचे नुकसान होवू नये म्हणून हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करतात. लोकमतने या मुद्दाला वाचा फोडल्यानंतर पालक सुध्दा खळबळून जागे झाले असून विकास शुल्काच्या नावावर दरवर्षी शुल्क वसुली कशासाठी असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच याचा रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा निर्धार केला आहे.शहरातील इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडून दरवर्षी १० टक्के शुल्क वाढ केली जात आहे. तसेच पाठपुस्तके आणि गणवेश शाळेतून अथवा शाळेने सूचविलेल्या दुकानातून खरेदी करण्याची सक्ती विद्यार्थ्यांना केली जात आहे. तर काही शाळांनी स्वत:च शाळेत दुकान लावून पाठपुस्तके आणि गणवेश विक्री करीत आहे. बाजारपेठेपेक्षा जास्त दराने पाठपुस्तके आणि गणवेशाचे दर असल्याने पालकांची अक्षरक्ष: लूट केली जात आहे.विशेष म्हणजे या प्रकाराला जे पालक विरोध करतात त्यांना त्यांच्या पाल्याला आमच्या शाळेत शिकवू नका असे उलट उत्तर दिले जाते. अथवा वर्षभर त्या विद्यार्थ्याला टार्गेट केले जाते. त्यामुळे पालक सुध्दा आपला पाल्य इतर मुलांच्या तुलनेत मागे पडू नये यासाठी हा सर्व प्रकार मुकाट्याने सहन करीत असल्याचे चित्र आहे.दरम्यान या सर्व प्रकारावर शहरातील ‘गोंदिया विधानसभा’ या व्हॉटसअप ग्रुप ने चर्चेच्या माध्यमातून पुढाकार घेतल्याने शहरातील पालकांनी सुध्दा या प्रकारावर संताप व्यक्त केला. तसेच लोकमतने हा विषय लावून धरल्याबद्दल आभार मानले.विशेष खासगी शाळांकडून केली जाणारी अवाजवी शुल्क वाढ बंद करा, विद्यार्थ्यांना शाळेतूनच पाठपुस्तके घेण्याची सक्ती नसावी, तसेच खासगी शाळांच्या धर्तीवर सरकारी शाळांचा दर्जा सुधारण्यात यावा, या मागण्यांना घेवून पालकांनी शिक्षा संघर्ष समिती गठीत केली आहे. या समितीचे अध्यक्ष पुरूषोत्तम मोदी असून ११ सदस्यी कार्यकारणीचा सुध्दा समावेश आहे. शहरातील पालकांना या मोहीमेत सहभागी करुन घेण्यासाठी शिक्षा संघर्ष समितीने नावाने एक व्हॉटसअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी या ग्रुपशी शहरातील तीनशेच्यावर पालक जुळले असून या ग्रुपच्या माध्यमातून पालकांनी खासगी शाळांच्या शुल्क वाढीचा तीव्र विरोध केला आहे. शहरातील पालकांनी उभारलेल्या या लढ्यात लोकमत सुध्दा पालकांसह उभा राहणार आहे.विकास संस्थेचा मग भुर्दंड पालकांना का?खासगी शाळांकडून दरवर्षी विद्यार्थ्यांनाकडून शैक्षणिक शुल्क घेताना त्यात विकास शुल्काच्या नावावर विशिष्ट रक्कम घेतली जाते.खासगी शाळा इमारतींची मालकी ही व्यवस्थापनाची असते शिवाय यामुळे संबंधित संस्थेचा विकास होत असतो. मग याचा भुर्दंड पालकांना का असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे.पालक शिक्षक समितीचे गठन का नाही?शिक्षण विभागाच्या नियमानुसार खासगी शाळांचे शैक्षणिक शुल्क ठरविताना पालक शिक्षक समिती गठीत करुन त्यांचे मत विश्वासात घेवून हे शुल्क निश्चित करणे आवश्यक आहे. मात्र शहर आणि जिल्ह्यातील बºयाच खासगी शाळांमध्ये पालक शिक्षक समितीचे गठण केले जात नसल्याची माहिती आहे. तर काही शाळांमध्ये केवळ नावापुरत्याच समित्या गठीत केल्या जातात.शिक्षकांचे आर्थिक शोषणखासगी शाळा विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काच्या नावावर दरवर्षी मोठ्या प्रमाणात शुल्क वसुल करतात. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शैक्षणिक सुविधा देण्यासाठी हे शुल्क आकारले जात असल्याचे सांगितले जाते. मात्र प्रत्यक्षात बºयाच शाळांमध्ये याचा अभाव दिसून येतो. तर विद्यार्थ्यांकडून ३० ते ४० हजार रुपये शुल्क घेतले जात असले तरी या शाळांमध्ये नियुक्त शिक्षकांना १० ते १२ हजार रुपये वेतन देऊन राबविले जाते. यामुळे शिक्षकांचे सुध्दा आर्थिक शोषण होत आहे. मात्र मिळालेली नोकरी जावू नये या भितीने कुणीही यावर बोलत नाही.शिक्षण विभागाची डोळेझाकशहरासह जिल्ह्यातील विविध खासगी शाळांकडून शिक्षण विभागाच्या नियमांची सर्रासपणे पायमल्ली केली जात. यावर पालक संताप सुध्दा व्यक्त करीेत आहे. मात्र शिक्षण विभागाचे अधिकारी आमच्यापर्यंत तक्रार आली नाही असे कारण पुढे करुन याप्रकाराकडे डोळेझाक करीत असल्याचे चित्र आहे.तपासणीच्या दिवशी शिक्षकांना सुटीखासगी शाळांमध्ये अंत्यत तुटपुंज्या पगारावर शिक्षकांना राबवून घेतले जात असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. शाळांमध्ये प्रत्यक्ष नियुक्त शिक्षकांपेक्षा शिक्षण विभागाला माहिती देताना कमी शिक्षक दाखविले जातात. तसेच ज्या दिवशी शिक्षण विभागाचे अधिकारी शाळेला भेट देण्यासाठी येतात त्या दिवशी अर्ध्या शिक्षकांना सुटी दिली जाते. तसेच मोजक्याच शिक्षकांना उपस्थित राहण्यास सांगितले जाते. हा प्रकार बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.शिक्षा संघर्ष समितीची बैठक आजखासगी शाळांकडून होणारी मनमानी शैैक्षणिक शुल्क वाढ बंद व्हावी तसेच सरकारी शाळेच्या दर्जात सुधारणा व्हावी, तसेच पालकांच्या विविध समस्यांना घेवून शिक्षा संघर्ष समितीची पहिली बैठक बुधवारी (दि.१) सायंकाळी ६ वाजता हुतात्मा स्मारक सिव्हिल लाईन येथे आयोजित केली आहे.या बैठकीत यासर्व विषयांवर मंथन होणार आहे.

टॅग्स :Schoolशाळा