शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कुणाचे तिकीट कापणार, कुणाला मिळणार पुन्हा संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2024 15:26 IST

चर्चांनी तापले राजकीय वातावरण : विद्यमानांसह इच्छुकांची वाढली धाकधूक

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी उमेदवारांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे जिल्ह्यातील मतदारसंघातील समीकरण बदलण्याची शक्यता आहे. कुणाचे तिकीट कापणार आणि पुन्हा कुणाला संधी मिळणार, या चर्चांनी सध्या गोंदिया जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.

गोंदिया जिल्ह्यात गोंदिया, तिरोडा, आमगाव, अर्जुनी मोरगाव हे चार मतदारसंघ आहेत. यापैकी गोंदिया विधानसभा मतदारसंघात अपक्ष, तिरोडा मतदारसंघावर भाजप, आमगाव काँग्रेस आणि अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व आहे. मात्र, महायुती आणि महाविकास आघाडीच्या समीकरणामुळे उमेदवारी देताना काही मतदारसंघांत बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

गोंदिया विधानसभा मतदारसंघावर काँग्रेससह, उद्धवसेनेने सुद्धा दावा केला आहे, तर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या काँग्रेसच्या महामेळाव्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गोंदिया जिल्ह्यातील चारही मतदारसंघ लढविणार असल्याचे सांगत मित्र पक्षांची हवा टाइट केली होती, तर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या भाजपाच्या पक्ष निरीक्षकांसमोर काही नेते आणि पदाधिकाऱ्यांनी चार मतदारसंघांतून उमेदवार देण्याची मागणी केली. काहीही झाले तरी अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्रातून भाजपाच उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला होता. या मतदारसंघातून लढण्यासाठी भाजपाच्या इच्छुक उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे, हे विशेष.

गोंदिया विधानसभा मतदारसंघात माजी आ. गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेस पक्षात घरवापसी केल्याने या मतदारसंघातून भाजपाचा चेहरा कोण, याची चर्चा आहे, तर गेल्या निवडणुकीत भाजपाला रामराम करून अपक्ष निवडून आलेले विद्यमान आ. विनोद अग्रवाल हे आता नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत, तर तिरोड्यात भाजपकडून विद्यमान आ. विजय रहांगडाले हेच निवडणूक रिंगणात राहणार आहेत, तर त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणता उमेदवार देते, हे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. आमगाव विधानसभा मतदारसंघात विद्यमान आ. सहषराम कोरोटे हे पुन्हा रिंगणात राहणार असून भाजपा त्यांच्याविरुद्ध जुनाच चेहरा देते की नवीन तगडा उमेदवार देते, याकडे लक्ष लागले आहे. 

जिल्ह्यातील नेते बैठकांमध्ये व्यस्त गेल्या दोन-तीन दिवसांपासून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उमेदवारीला घेऊन नागपूर येथे गेल्या दोन- तीन दिवसांपासून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत बैठका सुरू आहेत. या बैठकींमध्ये गोंदिया जिल्ह्यातील भाजपाचे काही वरिष्ठ नेतेसुद्धा व्यस्त असल्याची माहिती आहे, तर २३ तारखेपूर्वी गोंदिया विधानसभा मतदारसंघातून भाजपाचा उमेदवार कोण, हे स्पष्ट होणार असल्याची चर्चा आहे.

जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याने वाढविली धाकधूक महायुती आणि महाविकास आघा- डीकडून काही जागांवर तह होऊन उमेदवार बदलण्याची शक्यता आहे. गेल्या दोन दिवसांपासून या घडामोडींना वेग आला आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील दोन मतदारसंघांत सुद्धा बदल होण्याची चर्चा आहे. त्यामुळे काहींची धाकधूक वाढली असून त्यांनी आपल्या विश्वासू नेत्यांच्या गाठीभेटीचे सत्र वाढविल्याचे चित्र आहे.

टॅग्स :gondiya-acगोंदियाPoliticsराजकारणvidhan sabhaविधानसभा