शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
2
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
3
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
4
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
5
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
6
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
7
आई आजारी, वडिलांचा पाय मोडला; शिक्षणासाठी, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी ‘ती’ चालवते ई-रिक्षा
8
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
9
“प्रहार स्वतंत्र सामाजिक संघटना म्हणून काम करेल”; बच्चू कडूंच्या प्रवेशानंतर शिंदेंनी केले स्पष्ट
10
'राजा शिवाजी'तील वाघनखं, चंद्रकोर, पेहेरावावरून सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा! पण रितेशने 'या' गोष्टींमध्ये बाजी मारली...
11
अरे बापरे! तुमच्या किचनमधील 'या' गोष्टी देतात थेट कॅन्सरला आमंत्रण; आजच फेकून द्या बाहेर
12
सोन्याच्या दराबाबत वर्ल्ड बँकेची मोठी भविष्यवाणी! २०२६ मध्ये अमाप वाढणार, पण २०२७ मध्ये धडाधड...
13
"एकनाथ शिंदेंनी हुल दिली अन् उद्धव ठाकरे..."; विधान परिषदेवरुन ज्योती वाघमारेंनी उडवली खिल्ली
14
MI vs SRH: मुंबई इंडियन्सच्या लाजिरवाण्या पराभवानंतर नीता अंबानी, आकाश अंबानींचा चेहराच पडला
15
ज्या बॉलरचं नाव ऐकून भल्याभल्यांना फुटतो घाम, त्यालाच मारला 'नो लूक सिक्स'; सलील आरोराचा व्हिडीओ व्हायरल?
16
“सॉरी जिया... मम्माला मरावंच लागेल”, महिलेची आत्महत्या; स्मशानभूमीत आला धडकी भरवणारा Video कॉल
17
Bank Holidays in May: मे महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद; कोणत्या राज्यात केव्हा असेल सुट्टी?
18
बागेत प्रियकरासोबत रोमान्स करत होती २ मुलांची आई, गावकऱ्यांनी दोघांना पाहिलं अन् पुढे असं काही केलं...
19
Buddha Purnima 2026 Wishes: बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा बुद्ध जयंती!
20
महायुती-महाविकास आघाडीचे ठरले; पाहा, विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी संपूर्ण उमेदवारांची यादी
Daily Top 2Weekly Top 5

हजारो कुष्ठरूग्ण शोधणार कोण?

By admin | Updated: February 1, 2015 22:58 IST

आपल्या अंगावर कसलाही चट्टा असेल तर त्याची तपासणी झटकन करा. तो चट्टा कुष्ठरोगाचाही असू शकतो. समाजात आपल्याला हिन भावना मिळेल या चुकीच्या समजपोटी तो

मनुष्यबळाचा अभाव : जिल्ह्यात दहाहजारी दोन कुष्ठरोगीनरेश रहिले - गोंदियाआपल्या अंगावर कसलाही चट्टा असेल तर त्याची तपासणी झटकन करा. तो चट्टा कुष्ठरोगाचाही असू शकतो. समाजात आपल्याला हिन भावना मिळेल या चुकीच्या समजपोटी तो चट्टा डॉट्करांना न दाखविल्यास त्याला विकृती येईल. त्या आजारातून मग बाहेर पडता येणार नाही. परिणामी गोंदिया जिल्ह्यात हजारो कुष्ठरूग्ण लपलेले आहेत. कुष्ठरोग निवारण दिवस महात्मा गांधीच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षी ३० जानेवारीला साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रम सन १९५५-५६ साली पाहणी, शिक्षण व उपचार या तत्वावर एकविध एकच उपचार पध्दती डीडीएस पध्दतीने राबविण्यास सुरूवात झाली. सन १९८१-८२ पासून प्रभावी औषधोपचाराचा समावेश असलेली बहुविध औषधोपचार पध्दती राज्यात टप्याटप्याने लागू करण्यात आली. १९९५-९६ पर्यंत राज्यातील सर्व जिल्हे या योजनेंतर्गत आणण्यात आले. कुष्ठरोग निर्मूलनाचे ध्येय साध्य करणे, विकृती प्रतिबंध आणी पुनर्रचनात्मक शस्त्रक्रियेव्दारे विकृती दर्जा २ चे प्रमाण कमी करणे, जे प्रमाण एकविध पध्दतीच्यावेळी ५० ते ६० टक्के होते ते आज आज बहुविध उपचार पध्दतीने महाराष्ट्रात कुष्ठरूग्णांचे प्रमाण दरहजारी १ चे खाली आहे. गोंदिया जिल्ह्याचे प्रमाण महिन्याकाठी ५ ते ६ टक्यावर आले आहे. जिल्ह्यात डिसेंबर २०१५ अखेर कुष्ठरुग्णाचे प्रमाण दर दहा हजार लोकसंख्येत २ इतके असल्याचे शासकीय यंत्रणा सांगते. समाजामध्ये अजूनही सुप्त स्वरूपात कुष्ठरुग्ण लपलेले आहेत. कुष्ठरोगाच्या निर्मुलनासाठी सुप्त स्वरूपात लपलेल्या कुष्ठरूग्णांना शोधून काढण्याची गरज आहे. कुष्ठरोग निवारण मोहीम संपूर्ण जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. कमी कुष्ठरुग्ण असलेल्या सालेकसा तालुक्यात दिनांक ६ ते १३ फेब्रुवारी २०१५ व उर्वरीत ७ तालुक्यात १६ ते २१ फेब्रुवारी या कालावधीत आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ता घरोघरी जावून जनजागृती व नविन कुष्ठरुग्ण शोधमोहीम राबविणार असल्याचे आरोग्य यंत्रणा सांगते. मात्र कुष्ठरोग विभागात काम करण्यासाठी आठ तालुक्यांसाठी चारच टेक्नीशियन आहेत. त्यांची शोधमोहीम घेण्यासाठी शासकीय यंत्रणाही सक्षम नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मनुष्यबळाअभावी मागील दहा वर्षापासून जिल्ह्यात कुष्ठरूग्णांना शोधण्यासाठी ठोस पाऊले उचलण्यात आले नाही. त्यामुळे गोंदिया जिल्ह्यात हजारो कुष्ठरोगी लपलेले आहेत.मानधन नाही शोधणार कोण?कुष्ठरूग्णांची शोध मोहीम आरोग्य कर्मचारी व आशा कार्यकर्ती राबविणार असे सांगण्यात आले. परंतु आरोग्य कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर कामाचा अधिक बोझा असल्यामुळे ते फक्त कागदावरच कुष्ठरूग्णांची शोधमोहीम राबविल्याचे दाखवितात. आशा कार्यकर्तीला शोधमोही करण्यासाठी मानधन दिले जात नाही. रूग्ण मिळाला तरच त्यांना मानधन दिले जाईल अन्यथा त्यांना मानधन दिले जाणार नाही, असे शासनाने ठरविल्यामुळे आशा कार्यकर्ती शोध मोहीम कशी राबविणार हा प्रश्न आहे.प्रत्येक आरोग्य केंद्रात स्वतंत्र टेक्निशियनची गरजजिल्ह्यात लपलेल्या कुष्ठरूग्णांची संख्या हजारापेक्षा अधिक असल्यामुळे शासनाने प्रत्येक आरोग्य केंद्रात कुष्ठरोगासाठी स्वतंत्र कुष्ठरोग टेक्नीशियन नियुक्त करण्याची गरज आहे. चार तालुक्यात टेक्निशियनच नाहीतजिल्ह्यात आठ तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यात एक टेक्नीशियन असतो. मात्र गोंदिया जिल्ह्यातील चार टेक्नीशियन सेवानिवृत्त झाल्यामुळे आता चारच टेक्नीशियन आहेत. चार तालुक्यात रिक्त असलेल्या टेक्नीशियनमुळे कार्यरत असलेल्या टेक्नीशियनवर दोन तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.