शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

धान खरेदीतील अनियमिततेस जबाबदार कोण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 05:00 IST

जिल्ह्यात यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या विक्रमी धान खरेदीने मागील वीस ते पंचविस वर्षातील धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे. विक्रमी धान खरेदीने खरोखरच जिल्ह्यात ऐवढे धानाचे उत्पादन खरोखरच उत्पादन झाले का हे सुध्दा विचार करण्यास भाग पाडले आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा हमीभाव आणि बोनस मिळाल्याने धानाला चांगला दर मिळाला.

ठळक मुद्देकारवाई नेमकी कुणावर : चौकशी अहवालात नेमके दडलेय काय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अंतर्गत यंदा रब्बी आणि खरीप हंगामात खरेदी केलेल्या धान खरेदी मोठ्या प्रमाणात घोळ असल्याची ओरड सुरु होती. त्यातच या खरेदी केंद्राचा उपयोग शेतकऱ्यांना कमी आणि खासगी व्यापाऱ्यांनी अधिक करुन घेतला. ही बाब जिल्हा प्रशासनाने केलेल्या चौकशीत सुध्दा स्पष्ट झाली आहे. त्यामुळे शासकीय धान खरेदीतील अनियमिततेस नेमके जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.जिल्ह्यात यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर खरीप आणि रब्बी हंगामात एकूण ५७ लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली. या विक्रमी धान खरेदीने मागील वीस ते पंचविस वर्षातील धान खरेदीचे रेकार्ड मोडले आहे. विक्रमी धान खरेदीने खरोखरच जिल्ह्यात ऐवढे धानाचे उत्पादन खरोखरच उत्पादन झाले का हे सुध्दा विचार करण्यास भाग पाडले आहे. शासकीय धान खरेदी केंद्रावर यंदा हमीभाव आणि बोनस मिळाल्याने धानाला चांगला दर मिळाला. त्यामुळे खासगी व्यापाऱ्यांनी सुध्दा या संधीचा पुरेपूर फायदा करुन घेतला.शेतकऱ्यांचे सातबारा गोळा करुन आणि धान खरेदी केंद्रावरील कर्मचाऱ्यांना हाताशी घेवून हजारो क्विंटल धानाची विक्री केली. ही बाब सुध्दा जिल्हा प्रशासनाने नुकत्याच केलेल्या चौकशीत स्पष्ट झाली आहे. मात्र ज्यावेळी व्यापाऱ्यांचा धान खरेदी केला जात आहे ही ओरड वाढली तेव्हा प्रशासनाने कुठलीच कारवाई केली नाही. काही खरेदी केंद्रावरुन थेट ट्रक धर्मकाट्यावर पाठवून तो धान राईस मिलमध्ये पाठविण्यात आला. हा प्रकार स्थानिक प्रशासनाच्या निदर्शनास येऊन सुध्दा कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे धान खरेदीतील अनियमिततेस नेमके जबाबदार कोण हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.मध्यप्रदेश, छत्तीसगडचा धानाची जिल्ह्यात विक्रीयंदा खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामात लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेशातील धानाची मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात धान खरेदी केंद्रावर विक्री करण्यात आली.त्यामुळे जिल्ह्यातील धान खरेदीचा आकडा यंदा एकदम फुगला. हा प्रकार या राज्याच्या सीमावर्ती भागातील शासकीय धान खरेदी केंद्रावर झाला.धानाच्या गुणवत्तेची तपासणी केल्यास याचे सुध्दा बिंग फुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.अधिकाऱ्यांना फोन उचलण्याची अ‍ॅलर्जीजिल्ह्यातील बऱ्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना सध्या फोन उचलण्याची अ‍ॅलजी झाल्याचे चित्र आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी असो वा आरोग्य विभागाचे अधिकारी यांना महत्त्वपूर्ण माहिती घेण्यासाठी फोन केला असता ते कुठलाच प्रतिसाद देत नाही. मात्र त्यांच्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा सुध्दा वचक नाही.शासकीय धान खरेदी संदर्भात करण्यात आलेल्या चौकशीची माहिती जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून घ्या असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. पण त्यानंतरही जिल्हा पुरवठा अधिकारी फोन उचलून माहिती देत नसल्याने जिल्हा प्रशासनावर नेमका वचक कुणाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड