गोंदिया : शहरातील मामा चौकात रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला असून, यामुळे एखाद्यावेळी मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशात दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा सवाल करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण यांना शुक्रवारी (दि.१७) निवेदन देण्यात आले.
मामा चौकातून साई मंदिरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील नालीच्या पुलाला मधोमध खड्डा पडला आहे. हा रस्ता सतत वर्दळीचा असल्याने अनावधानाने एखादा मोठा अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यावरून मनसेचे उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, तालुकाध्यक्ष सुरेश ठाकरे, शहर अध्यक्ष राजेश नागोसे, शहर उपाध्यक्ष रजत बागडे, वतन माणिक यांनी मुख्याधिकारी चव्हाण यांना निवेदन दिले. यावर त्यांनी लगेच खड्डा दुरुस्तीबाबत आदेश दिले आहेत.