शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

गोंदिया मार्गावरील पथदिवे केव्हा उजळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:59 IST

दोन वर्षे लोटूनही उपाययोजना नाही: केवळ खांब उभारून ठेवले

लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : आमगाव-देवरी व आमगाव- गोंदिया या महामार्गाचे नूतनीकरणाचे काम बहुतांश पूर्ण झालेले आहे. कंत्राटदार कंपनीने या महामार्गावर मधात पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. परंतु हे पथदिवे शोभेची वस्तू ठरत आहे. त्यामुळे रात्री या पथदिव्याखाली अंधारच असतो. त्यामुळे वाहन चालकांना सुद्धा याचा फटका बसत आहे.

सन २०१७ पासून आमगाव देवरी व आमगाव गोंदिया महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली. देवरी ते गोंदिया मार्गाचे बहुतांश काम पूर्ण झालेले आहे. शहरालगत असलेले रेल्वे चौकीवरील उड्डाणपुलाअभावी काही काम अपूर्ण आहे. त्यामुळे या रस्त्यावर रात्रीला अंधारात असतो. कंत्राटदार कंपनीने मागील दोन वर्षांपूर्वीच या महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च करून पथदिव्यांची व्यवस्था केली आहे. परंतु कंपनीने ही व्यवस्था नगरपरिषद प्रशासनाला हस्तांतरित केली नसल्यामुळे दोन वर्षे लोटूनही पथदिवे बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे या पथ दिव्याखाली खाली उजेड केव्हा पडणार असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे. आजूबाजूच्या परिसरातील अनेक नागरिक आमगाव शहरात खरेदीसाठी ये-जा करतात.

तसेच अनेक नागरिक कामावरून परततात पण पथदिवे बंद असल्याने सायकलने व दुचाकीने प्रवास करणाऱ्यांना याचा फटका बसत आहे. अंधारामुळे या ठिकाणी अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे.

पथदिव्यांचे वीज बिल कोण भरणारकंत्राटदार कंपनीने पथदिवे तर उभारले परंतु डिमांड भरून मीटरची व्यवस्था केली नाही. तसेच टेस्ट करून आम्हाला हस्तांतरित केले नाही. त्यानंतर वीज बिलाच्या आर्थिक बोजा नगरपरिषदेला सहन करावा लागणार आहे. नगर परिषद आधीच आर्थिक अडचणीत आहे. त्यामुळे पथदिव्यांचा खर्च कुठून करणार असे नगर परिषदेचे अधिकारी सांगतात.

शासनाकडून मिळणारा निधी जातो कुठेआमगाव ग्रामपंचायत नंतर आमगाव नगर परिषदमध्ये रुपांतरीत झाल्यापासून शासनाकडून मिळणाऱ्या निधीत वाढ पण झाली आहे. मात्र हा निधी जाते कुठे असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा पुरविणे नगर परिषदचे काम आहे व सुविधा मिळणे गरजेचे आहे. पण याकडे नगर परिषद पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे.

कामावरून परतताना रात्री उशिरापर्यंत घरी या मार्गावरून जाताना अंधार असल्यामुळे व किडंगीपार नाल्याजवळ असलेले मोठमोठे खड्डे अंधारात दिसत नाही. त्यामुळे या ठिकाणी अनेकदा अपघात झाले आहे. प्रशासनाने लवकरात लवकर पथदिवे सुरू करावे अशी मागणी आहे.- रमेश चुटे, नागरिक किडंगीपार 

टॅग्स :gondiya-acगोंदिया