शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
2
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
3
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
4
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
5
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
6
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
7
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
8
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
9
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
10
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
11
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
12
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
13
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
14
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
15
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
16
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
17
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
18
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
19
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
20
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळेचे कुलूप केव्हा उघडणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 05:00 IST

आश्रमशाळेतील परिसर हा लोकवस्तीपासून दूर असल्याने तसेच एकाच ठिकाणी राहत असल्याने व बाहेरील लोकांशी संपर्क येत नसल्याने आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षित राहणे शक्य आहे. शाळांमध्ये आरटीपीसीआर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत निवासी ठेवणे व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा एकमेव उपाय असल्याने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

दिलीप चव्हाणलोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : आदिवासी विकास विभागाच्या अंतर्गत शासकीय व अनुदानित अशा शाळा महाराष्ट्र शासन आदिवासीबहुल भागात चालविते. मागील सत्रात फेब्रुवारी २०२० पासून कोरोनामुळे या सर्वच आश्रमशाळा बंद होत्या. या शैक्षणिक सत्रात ५ जुलैपासून इयत्ता ८ ते १२ वीपर्यंत वर्ग सुरू करण्यात आले. इयत्ता १ ते ७ शाळा सुरू करण्याचा मुहूर्त अजूनही सापडलेला नाही. त्यामुळे यावर्षीसुद्धा आश्रमशाळा सुरू होणार की नाही, अशा प्रश्न विद्यार्थी व पालक, शिक्षकांना पडलेला आहे. शालेय शिक्षण विभागाने राबविलेले शिक्षण सेतू प्रकल्प, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राबविणे प्रत्यक्षात वस्तुस्थितीला धरून नाही. जि. प. शाळांतील विद्यार्थी हे त्याच गावातील किंवा जास्तीत जास्त ३ कि.मी. परिसरातील असल्याने चावडीत गोळा करून कोरोना नियम पाळून शिक्षण सेतू अभियान राबविण्यात आला; परंतु आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळेपासून ५० ते ६० कि. मी. परिसरातील असल्याने प्रत्यक्षात १ ते ७ करिता प्रत्येक शाळेवर ७ शिक्षक व गावांची संख्या ४० ते ७० त्यातही एका गावात १ ते ५ एवढी विद्यार्थी संख्या तेही वेगवेगळ्या वर्गातील त्यामुळे शिक्षकांनी जरी दररोज एका गावाला भेट घेतली. तरी त्या गावाला पुन्हा भेट देण्यासाठी ४० दिवस लागतील. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या साधनांचा वापर शिकविण्याचा प्रयत्न केला; पण ते शक्य झाले नाही. 

पाठ्यपुस्तकांशिवाय शैक्षणिक सत्र - या सत्रात इयत्ता पहिली ते आठव्या वर्गांची पाठ्यपुस्तके सर्व शिक्षा अभियानांतर्गत शाळांना पुरविली नसल्याने, तसेच मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाठ्यपुस्तके विद्यार्थ्यांना घरपोच दिल्याने पुस्तके काळजीपूर्वक हाताळली गेली नसल्याने ती परत शाळेत आलीच नाहीत. त्यामुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी शाळेपासून व पाठ्यपुस्तकांपासून दूरच असल्याचे चित्र आहे. आश्रमशाळा सुरू करा- आश्रमशाळेतील परिसर हा लोकवस्तीपासून दूर असल्याने तसेच एकाच ठिकाणी राहत असल्याने व बाहेरील लोकांशी संपर्क येत नसल्याने आश्रमशाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षित राहणे शक्य आहे. शाळांमध्ये आरटीपीसीआर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना शाळेत निवासी ठेवणे व शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे हा एकमेव उपाय असल्याने इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

 

टॅग्स :Schoolशाळाcorona virusकोरोना वायरस बातम्या