शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

जीर्ण झालेल्या पुलाची दखल केव्हा घेणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 06:00 IST

या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.

ठळक मुद्देअनेकांना गमवावा लागला जीव : केव्हाही कोसळू शकतो कुआढास पूल

विजय मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : गडमाता मंदिर पहाडाच्या पायथ्याशी कुआढास नदीवरील पुलाची उंची फारच कमी असल्याने पावसाळ्यात केव्हाही पुलावरुन पाणी वाहते असते. पुलाला कसल्याही प्रकारचे कठडे लावले नसल्याने या पुलाने आतापर्यंत अनेकांचे बळी घेतले आहे.या पुलापासून काही अंतरावर बंधारा असून त्या बंधाऱ्यावरुन वेगाने पाणी वाहत येते. अशात हा जीर्ण झालेला पूल केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र संबंधित विभागाने याची अद्यापही दखल घेतलेली नाही. त्यामुळे हा पूल तयार करण्याची सद्बुध्दी प्रशासनाला केव्हा येणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.सालेकसा-नानव्हा मार्गावर असलेल्या या पुलावरुन जाताना वर्षभर जीवाला धोका असतो.एकतर या पुलाची उंची कमी असून पूल अरुंद असल्याने दोन्ही दिशेने येणारे कोणतेही वाहन किंवा बैलगाड्या एकाच वेळी पुढे जाऊ शकत नाही. अशात एकमेकाला जाण्यासाठी रस्ता सोडताना सरळ नदीत कोसळून पडण्याची भिती असते. तसेच कठडे लावले नसल्याने या पुलावरुन ये-जा करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. एवढेच नव्हे तर पुलाची उंची कमी असल्याने पुलाकडे जातांना उतार भागाला तोंड द्यावे लागते. अशात वाहनावर नियंत्रण ठेऊन काळजीपूर्वक जावे लागते.एखादे चारचाकी वाहन आल्यास विरुद्ध दिशेने वाहन किंवा बैलगाडी आली की अपघाताची शंभर टक्के शक्यता असते.सालेकसा मुख्यालयी आपल्या कामानिमित्त जाण्यासाठी नानव्हा, घोन्सी, गरुटोला, बिंझली, खोलगड, भरसूला, ढिमरटोला येथील लोकांना नेहमी या पुलावरुन ये-जा करावी लागते.शाळा-महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दररोज शेकडो विद्यार्थी या पुलावरुन ये-जा करतात.परंतु प्रत्येकाला आपला जीव मुठीत घेऊन हा पूल पार करावा लागतो. ५ वर्षापूर्वी पंचायत समितीचे माजी सभापती बाबुलाल उपराडे यांच्या पुतण्याची मोटारसायकल पूल ओलांडतांना पुलाच्या खाली गेली व तो पुरात वाहून गेला. सन २०१० मध्ये म्हसगाव येथील देवेंद्र बोपचे नावाचा इसम सायकलवरील ताबा सुटून पुलाखाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला. तर नानव्हा येथील केवललाल बिसेन बैलगाडीने जात असताना त्याच्या ही ताबा सुटल्याने बैलगाडीसह पुलाखाली पडला त्याचा कसाबसा जीव वाचला. परंतु बैलांचा जीव गेला. एकदा रोडरोलर या पुलावरुन चढतांना मागे घसरला व नदीत जाऊन पडला होता.या पुुलावर कठडे नसल्याने यावरुन ये-जा करताना जीवाला धोका असतो.२० वर्षापूर्वीच तयार केलेल्या या पुुलाचे दोन वेळा लोखंडी कठडे वाहून किंवा काही चोरी गेले.हा पूल सुद्धा अनेक ठिकाणातून जीर्ण झाला आहे. त्यामुळे यावरुन ये-जा करणाऱ्या लोकांसाठी हा पूल यमदूत ठरत आहे.नवीन उंच पूल तयार कराया पुलामुळे कित्येकांचा जीव गेला असल्यामुळे नवीन उंच पूल तयार करण्यात यावा म्हणून परिसरातील नागरिकांनी अनेकदा लोकप्रतिनिधींसह शासनाकडे मागणी केली. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आणखी किती बळी गेल्यानंतर शासनाचे लक्ष या पुलाकडे जाईल असा संतप्त सवाल गावकऱ्यांनी उपस्थित केला.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षा