शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

कालव्यातील अतिक्रमण विरोधी अंमलबजावणी कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 05:00 IST

जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा पुरविणे आवश्यक आहे.

ठळक मुद्देप्रदूषणात वाढ : सिंचनासाठी पाणी मिळेणा, संबंधित विभागाचे दुुर्लक्ष

यशवंत मानकर।लोकमत न्यूज नेटवर्कआमगाव : बाघ ईटीयाडोह पाटबंधारे विभागाच्या कार्यप्रणालीचे नियंत्रण नसल्याने या विभागाच्या कालव्यांवर काही नागरिक अतिक्रमण करीत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे यात साचून असलेल्या घाण पाणी व केरकचऱ्यामुळे प्रदूषणाच्या समस्येत वाढ झाली आहे.जिल्ह्यात मोठे व मध्यम सिंचन प्रकल्पमुळे सिंचन प्रकल्प आहेत. दोन मोठे सिंचन प्रकल्प, मध्यम प्रकल्प नऊ, लघु व इतर प्रकल्प असे एकूण १९९ प्रकल्प आहेत आहे. शासनाच्या धोरणनुसार या प्रकल्पांची उभारणीसह सिंचन विकास योजना तयार करणे अपेक्षित आहे. सदर सिंचन प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सुविधा पुरविणे आवश्यक आहे. सदर सिंचन सुविधेमुळे पाण्याची पातळी वाढवून सिंचनाला अधिक उपयोगिता करून देण्याचे ध्येय शासन निश्चित करीत आहे. सिरपूर धरण, पुजारीटोला, गाढवी नदी, ईटियाडोह, कालीसरार, जिल्हा सीमेवरील संजय सरोवर या धरणाची मोठ्या प्रमाणात उपयोगिता आहे. सिंचन प्रकल्पांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सिंचन सुविधेसह मत्स्यपालन व्यवसाय व वन्यजीव प्रकल्प वाढविण्यासाठी सिंहाचा वाटा आहे. पंरतू धरण व कालवे परिसरातील वाढत्या अतिक्रमणाने यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.आमगाव तालुक्यातील ११ गावांचा, देवरी १४, सालेकसा १७,गोंदिया १७, अर्जुनी मोरगाव १३ अश्या एकूण ८२ गाव सीमा मार्गातून कालव्यातून शेतकºयांना पाणी उपलब्ध करून देण्यात येते. सिंचन प्रकल्पातून शेतकऱ्यांना कालव्याच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून देण्यात येते. सदर कालव्यातून पाणी उपलब्ध होत असताना ग्रामीण व शहरी भागातून जात असते.यावेळी नादुरुस्त व फुटलेले कालव्यातून पाण्याचा विसर्ग होऊन नागरिक वस्तीत जाऊन पाण्याची नासाडी होते असल्याचे निदर्शनास आहे. कालव्यांवर काही ठिकाणी नागरिकांनी अतिक्रमण केले असल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग न होता ते तसेच साचून आहे. परिणामी प्रदूषणात वाढ होत असल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन ही समस्या मार्गी लावण्याची गरज आहे.

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पpollutionप्रदूषण