लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनअंतर्गत अवघ्या राज्यातच परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गोंदिया आगारातील लालपरिचीही चाके थांबली आहेत. आगारातून सुटणाऱ्या दररोजच्या ४१० फेऱ्या पूर्णपणे बंद असून १०० टक्के लॉकडाऊन पाळला जात आहे. मात्र ऐन हंगामात राज्य परिवहन महामंडळाला आर्थिक फटका बसत आहे.उन्हाळ्यातील शाळा-महाविद्यालयांच्या सुट्या व तसेच लग्नसराईचा हंगाम असल्याने उन्हाळा राज्य परिवहन महामंडळासाठी कमाईचा काळ असतो. वर्षभरात होणारी कमाई महामंडळ उन्हाळ्यात करून टाकते. यंदा मात्र देशात कोरोनाचा शिरकाव झाल्याने अवघ्या देशातील अर्थव्यवस्थेलाच ग्रहण लागले आहे. देशवासीयांचे आरोग्य महत्त्वाचे असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चपासून अवघ्या देशातच लॉकडाऊन केला आहे. यामुळे सर्वत्र बंद पाळला जात असून खासगी प्रवासी वाहनांसह रेल्वे व बसफेºयाही बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी गोंदिया आगारातील लालपरिही उभीच असून दररोज सुटणाऱ्या ४१० फेऱ्या बंद आहेत. परिणामी कमाईचा हंगाम आगाराच्या हातून निघून गेला असून आगाराला मोठा अर्थिक फटका सहन करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे लोकांचे घराबाहेर पडणे बंद असून सोबतच लग्न सोहळे व अन्य कार्यक्रमही रद्द करण्यात आले आहेत.अद्याप पगार झालेच नाहीराज्य परिवहन महामंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पगार नेहमी ७ तारखेला होतात. मात्र यंदा अद्याप पगार झाले नसल्याची माहिती आहे. अधिकाऱ्यांचा १६ दिवसांचा तर कर्मचाऱ्यांचा २४ दिवसांचा पगार पहिल्या टप्प्यात काढला जाणार असल्याची माहिती असून उर्वरीत पगार दुसऱ्या टप्प्यात निघणार आहे. १-२ दिवसांत पगार निघणार असे कर्मचाऱ्यांना सांगितले जात आहे.प्रवाशांना लालपरीची आठवणगोंदिया आगारातून दररोज लालपरीच्या ४१० फेऱ्या होत असून यातून सुमारे २१ हजार प्रवासी प्रवास करतात. यात, ६० फेऱ्या जिल्हाबाह्य असून ३५ फेऱ्या आंतरजिल्हा आहेत. तर उर्वरीत ३१५ फेऱ्या जिल्हा अंतर्गत आहेत. प्रवाशांना त्यांच्या गावापर्यंत सोडण्याची सेवा देणारी लालपरी ही प्रवाशांच्या विश्वासाची आहे. मात्र सध्या लालपरीची चाकं थांबली असल्याने प्रवाशांना आता लालपरीची आठवण येत आहे.पंधरा दिवसात दोन कोटी रुपयांचा फटकागोंदिया आगारातून दररोज एसटी बसेसच्या ४१० दहा फेऱ्या होत होत्या. त्यातून आगाराला १० ते १२ लाख रुपयांचे उत्पन्न दररोज प्राप्त होत होते. मात्र मागील पंधरा दिवसांपासून बस फेऱ्या पूर्णपणे बंद असल्याने सुमारे दोन कोटी रुपयांचा फटका बसल्याचे आगाराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले
Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील लालपरीची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 20:29 IST
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनअंतर्गत अवघ्या राज्यातच परिवहन महामंडळाच्या बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. त्यानुसार, गोंदिया आगारातील लालपरिचीही चाके थांबली आहेत.
Corona Virus in Gondia; गोंदिया जिल्ह्यातील लालपरीची चाके थांबली
ठळक मुद्दे१०० टक्के लॉकडाऊन सर्वच बस फेऱ्या बंद