शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार? विद्यार्थी, पालक संभ्रमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:18 IST

गोंदिया : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची ...

गोंदिया : कोरोनामुळे उशिरा का होईना इयत्ता दहावीचा निकाल लागला आणि इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी दाखले जमविण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. परंतु या दहावीच्या गुणपत्रिकेवर काय शेरा असणार? दाखल्यावर तारीख आणि महिना कोणता राहील या संभ्रमात स्वत: मुख्याध्यापकही आहेत. हीच चिंता विद्यार्थी व त्यांच्या पालकांना सतावत आहे.

शिक्षणमंडळाने आतापर्यंत विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली नाही. शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावरून विद्यार्थ्यांनी गुणपत्रिका काढली त्यात एप्रिल २०२१ असे नमूद आहे. परंतु दाखल्यावर तो महिना लिहायचा किंवा नाही अशा संभ्रमात मुख्याध्यापक आहेत. यामध्ये शेराचा कॉलम सुटलेला आहे. त्यामुळे काय शेरा असणार हे सांगता येत नाही. आता बोर्डाच्या सूचना आल्यावरच संभ्रम दूर होणार आहे. काही शाळांनी विद्यार्थ्यांच्या टीसी तयार केल्या आहेत. जगभरात कोरोनाचा संकट कायम असल्याने यातून महाराष्ट्र कसा सुटणार तरीही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात आले. परंतु ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षणाचा फायदा विद्यार्थ्यांना झाला नाही. शिक्षण मंडळाने नववीच्या आधारावर दहावीचा निकाल दिला; परंतु या निकालात हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. नवव्या वर्गाला गांभीर्याने न घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे या निकालाने नुकसान झाले. आता निकाल लागल्याने अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांची धावपळ सुरू झाली आहे. शाळा सोडणाऱ्या दाखल्यावर तारीख, महिना तसेच शेरा काय लिहायचा हा मुख्याध्यापकांना प्रश्नच पडला आहे.

................................

मुख्याध्यापक काय म्हणतात...

विद्यार्थ्यांची टीसी तयार करताना त्या टीसीवर शेरा काय लिहायचा यासाठी आता शासनाच्या सूचनांची वाट पाहावी लागेल. आमच्या शाळेत परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दरवर्षी आम्ही त्यांच्या व्यवहार व वागणे यावरून शेरा लिहित होतो.

-अनिल मुरकुटे

मुख्याध्यापक, विद्या निकेतन आमगाव.

..............

दहावीची परीक्षा न देताच विद्यार्थ्यांना पास करण्यात आले. नववीच्या आधारावर दहावीचे गुणदान करण्यात आले. परंतु टीसीवर काय शेरा लिहायचा यासंदर्भात सूचना देण्यात आल्या नाहीत. तसेच टीसीवर तारीख आणि महिना काय नमूद करावा याच्याही सूचना मिळाल्या नाहीत.

-सी.जी. पाऊलझगडे

मुख्याध्यापक, संत जयरामदास हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय ठाणा.

...............

दहावीचा निकाल लागला परंतु शाळेकडून गुणपत्रिकाच मिळाल्या नाहीत. त्यामुळे पुढच्या वर्गात प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न आहे. आता सर्व विद्यार्थी जेव्हा प्रवेश घेतील तेव्हाच आपल्या मुलीलाही शाळेत प्रवेश दाखल करू.

- संतोष हुकरे पालक

..................

नववीच्या आधारावर दहावीचे गुण देण्यात आले. परंतु नववीला कुणी गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. दहावीचा निकाल लागूनही गुणपत्रिका मिळाल्या नाहीत. कोरोनाच्या संकटाने आमच्या मुलांचे शिक्षण बुडाले. आता अकरावीच्या प्रवेशासाठी कामाला लागणार.

रामदास मेंढे, पालक

...................

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा- ३६९

दहावीतील विद्यार्थी- १९२७४

उत्तीर्ण विद्यार्थी- १९२६०

पास झालेली मुले-९८६७

पास झालेल्या मुली-९३९३

................

बोर्डाने या शेरा संदर्भात आतापर्यंत मार्गदर्शक सूचना पाठविलेल्या नाहीत. मार्गदर्शक सूचना येताच तशा सूचना संबंधित शाळांच्या मुख्याध्यापकांना देण्यात येईल. शासन सर्व गोष्टीवर माहिती देत आहे. यावरही माहिती लवकरच देईल अशी आशा आहे.

- प्रदीप समरीत

उपशिक्षणाधिकारी, माध्यमिक जि.प. गोंदिया.