शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

चक्रव्युहात सापडलेल्या आमगावचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2016 01:55 IST

आमगाव नगरीला काही महिन्यांपासून लागलेली साडेसाती पिच्छा सोडायला तयार नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या आशा आकांक्षा भंग पावल्या आहेत.

ओ.बी. डोंगरवार ल्ल आमगाव नगरीला काही महिन्यांपासून लागलेली साडेसाती पिच्छा सोडायला तयार नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षाच्या आशा आकांक्षा भंग पावल्या आहेत. आमगाव नगरीचे काय होणार यावर कोणीच भाष्य करायला तयार नाही. निर्णय शासन दरबारी होणार हेच सर्वसामान्याच्या तोंडून ऐकले जात आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर समोरची कारवाई शासन करणार असे स्पष्ट करण्यात आले, मात्र निर्णयाची फाईल मंत्रालयात धुळखात पडली आहे. अजूनपर्यंत शासनाकडून निर्णय आला नाही, अशा चक्रव्युहात आमगाव नगरी सापडली आहे. ज्या मान्यवरांनी नगरपंचायत नको, नगर परिषद व्हावी याकरीता न्यायालयात धाव घेतली त्यांनी हार का मानावी? न्यायालयाने नगर परिषद करण्याचे अधिकार शासनाला आहेत, असा निर्णय दिला, तर मग कुठे गाडी अडली आहे? आता बराच कालखंड लोटला, मात्र नगरवासीयांच्या हातात काही लागले नाही. तात्पर्य तेलही गेले तूपही गेले, अशी स्थिती आहे. सांगण्याचा उद्देश असा की, पुन्हा याचिकाकर्त्यांनी न्यायालयात जाऊन न्यायालयाच्या आदेशाची अंलबजावणी होण्यास विलंब लागत आहे, त्यावर काहीतरी शासनाने निर्णय घ्यावा, नगर परिषद नाही तर नगर पंचायत देऊन नगरवासीयांना थोडा का होईना दिलासा द्यावा, यासाठी पुढाकार घेणे गरजेचे झाले आहे. म्हणजे रडत्याची आसवे पुसण्याचे काम शासनाने केले पाहिजे. विलंब होण्यास कारण शोधले तर विपरीत परिस्थिती नगर परिषदेकरीता नाही. सर्वच पोषक परिस्थीती असताना घोषणा का नाही? याची सर्वसामान्यात चर्चा सुरू आहे. आता पावसाळा सुरू होणार मग घोषणा कोणतीही झाली तरी निवडणूक होणार नाही. म्हणजे नगर पंचायत, नगर परिषद किंवा जैसे थे ग्राम पंचायत राहीली तरी प्रशासकाचे काम राहील. पावसाळ्यानंतर निवडणुका होऊन लोकप्रतिनिधीचे सरकार स्थापन होईल. त्याला जवळपास तीन ते चार महिन्याच्या कालावधी लोटेल. याकरीता आता शासन दरबारातून कोणतीही घोषणा झाली तरी प्रशासकाची नियुक्ती करून केवळ वाट पहा असेच वेळापत्रक राहील. मात्र आज नगरात ज्या समस्या समोर आहेत, किंवा ज्या नवीन समस्या जन्म घेत आहेत यावर उपाय कोण शोधून काढणार? व प्रयत्न कोण करणार? असा गंभीर प्रश्न जनतेसमोर उभा आहे. यात शासनाचा सुध्दा मोठा तोटा आहे. घोषणा कोणतीही असो, त्यावर टॅक्स आकारणी केली जाणार, तेवढा पैसा शासन दरबारी जमा होईल. मात्र आज आमगाव नगरीचे प्रशासन ग्राम पंचायतच्या माध्यमाने चालविले जात आहे. कर्मचारी व प्रशासनकर्त्यांना तेवढा जोश दिसत नाही, ते काही बोलून दाखवत नसतील तरी आतल्या आत काहीतरी खदखदत असले पाहिजे. यावर एकच उपाय आहे की जनप्रतिनिधीनी नगरपरिषद होण्याकरीता संघटीतपणे लढा उभा केला पाहीजे. लोकसंख्येचा आधार घेऊन आमगावला नगरपालिकेचा दर्जा देण्यास काहीच अडचण नाही. मात्र मांजर कुठे आडवी गेली? शासन दरबारी निर्णय का होत नाही? जिल्ह्यात चार तालुक्यात नगर पंचायत झाल्या, एक न्यायालयात प्रलंबित आहे. तिथे देवरी, मोरगाव अर्जुनी, सडक-अर्जुनी, गोरेगाव येथे विविध पक्षांची सत्ता स्थापन होऊन जनप्रतिनिधी आपल्या विकास कार्यात लागले आहेत. मात्र दुर्दैव आमगाव नगराचे की कोण विकासात्मक कामावर बोलणार हीच मोठी गंभीर समस्या आहे. पावसाळ्यापूर्वी नाले सफाई, स्वच्छता व इतर जनसमस्या सोडविण्याकरीता फक्त नियुक्त शासकीय अधिकारी काम पाहणार असेल तरी त्याच्यावर सुध्दा समस्याचा भडीमार नागरिकाकडून होणार. त्यामुळे अधिकाऱ्याने उत्तर देण्याची तयारी ठेवणे गरजेचे आहे. जनप्रतिनिधीनी सर्वच एकत्र येऊन यावर विचारमंथन करणे गरजेचे आहे. मात्र आतापर्यंत सर्वदलीय राजकीय नेते यावर एकत्र आले नाही. जे नगर परिषदेसाठी न्यायालयात गेले त्यांनी पुन्हा दंड थोपटले पाहीजे. न्यायालयाच्या निर्णयानंतर शासनाकडून विलंब का? हाच महत्वाचा मुद्दा समोर येत आहे. जर नगरपरिषदेची घोषणा झाली तर आज ज्यांची दुकानदारी चालू आहे ती तत्काळ बंद होईल. नगराच्या विकासाचा विचार न करता स्वत:चा विकास कसा होईल असा कदाचित काहीचा उद्देश असू शकतो. त्यामुळे हे चक्रव्युह तोडणे गरजेचे झाले आहे.