तिरोडा : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे झालेल्या १४ व्या आमदार चषक राज्यस्तरिय वुशू अजिंक्यपद स्पर्धेत सान्सू व ताऊलू गटात अनुक्रमे कोल्हापूर व पुणे जिल्ह्याच्या खेळाडूंनी बाजी मारली. या स्पर्धेत राज्यातील ३३ जिल्ह्यातील खेळाडू सहभागी झाले होते.आॅल महाराष्ट्र वुशू असोसिएशनच्या वतीने आणि गोंदिया जिल्हा वुशू असोसिएशनच्या सहकार्याने तिरोडा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये सदर राज्यस्तरीय ज्युनिअर वुशू अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये संपूर्ण राज्यातील ३३ जिल्ह्यांतून १०४० स्पर्धकांनी सहभाग घेतला. ताऊलू व सान्सू अशा दोन प्रकारात ही स्पर्धा झाली. बक्षीस वितरण आ.अनिल सोले यांच्या हस्ते आणि आ.विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष अजय गौर, डॉ.जुगलकिशोर लढ्ढा, डॉ.चिंतामन रहांगडाले, पंकज कटरे, सलाम शेख, आर.जी.पंचबुध्दे, प्रदीप मेश्राम, संजय नागपुरे, निकेश मिश्रा, विकेश मेश्राम, दीपक घरजारे अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी वुशू या खेळासाठी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त प्रशिक्षक संदीप शेलार मुंबई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल गोंदिया जिल्हा वुशू असोसिएशनचे सचिव सुनील शेंडे यांचा सत्कार करण्यात आला. (तालुका प्रतिनिधी)
वुशू स्पर्धेत पश्चिम महाराष्ट्राचे खेळाडू अव्वल
By admin | Updated: October 2, 2016 01:22 IST