शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
2
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
3
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
4
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
5
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
6
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
7
Sena-MNS Rally: ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यापूर्वी संदीप देशपांडेंनी घातलेल्या टी-शर्टनं वेधलं लक्ष!
8
बाईकवरून आले अन् डोक्यातच घातल्या गोळ्या; प्रसिद्ध उद्योगपतीच्या हत्येनं परिसरात खळबळ
9
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?
10
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
11
"तुमचे बाप ज्यावेळी डायपरमध्ये होते तेव्हापासून हा माणूस.."; मराठी अभिनेता कोणावर भडकला? व्हिडीओ तुफान व्हायरल
12
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य- ०५ जुलै २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार सोन्याहून पिवळा!
13
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
14
अमेरिकन कंपनीचा शेअर बाजारात घोटाळा, जेन स्ट्रीट या ट्रेडिंग कंपनीने हेराफेरी करत मिळवला ३६,६७१ कोटींचा नफा; सेबीने कारवाई करत घातली थेट बंदी
15
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
16
८०% ‘जेन झी’ला करायचंय ‘एआय’शी लग्न, एआय पार्टनर्स आता मानवी नात्यांची जागा घेईल
17
तुझ्या भेटीची लागली आस... विठ्ठल मंदिर, प्रदक्षिणा मार्ग, स्टेशन रोड, चंद्रभागा वाळवंट परिसरात वैष्णवांची मांदियाळी
18
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
19
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश

लोखंडी कटघरे करतात प्रवाशांचे स्वागत

By admin | Updated: September 22, 2016 00:44 IST

दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे.

ड्रामाची मागणी : बंद लोखंडी गेट सुरू करागोंदिया : दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सर्वाधिक उत्पन्न देणारे स्थानक म्हणून गोंदियाची ओळख आहे. परंतु रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यासाठी प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. लोखंडी कटघरे व बंद असलेल्या लोखंडी गेट यामुळे प्रवाशांना लांब अंतर पायी चालत जावून स्थानकात प्रवेश करावा लागतो.गोंदिया रेल्वे स्थानकात दरवर्षी कोट्यवधी रूपयांच्या तिकिटा विक्री होतात. लाखो रूपये विशेष तपास अभियानांतर्गत रेल्वेला उपलब्ध होतात. परंतु प्रवासी सुविधांच्या नावावर अडचणी तयार करण्यात रेल्वेचे अधिकारी कुशल आहेत, असा आरोप ड्रामाने (डेल्वी रेल्वे मुव्हर्स असोसिएशन) केला आहे. बाजारा परिसराच्या रेल्वेच्या मुख्य प्रवेशद्वाराला लोखंडी पाईपने बेरिकेटिंग करण्यात आले आहे. चारही बाजूंना लोखंडी मोठमोठे पाईप लावून अडचणी निर्माण केल्या आहेत. गोंदियामध्ये लोखंडी गेट लावून कार, आॅटो, रिक्षा व इतर प्रवासी वाहनाने आपले लगेज घेवून पोर्चपर्यंत जावू दिले जात नाही. गोंदियात लोखंडी बेरिकेट्सशिवाय मोठे लोखंडी गेट लावण्यात आले आहेत. हे गेट नेहमीच बंद असतात. वृद्ध, महिला व बालकांना पोर्चपासून दूर अंतरावर उतरावे लागते. तसेच धावत जावून व पाईपवरून उडी घेवून आपला लगेज घेवून जावे लागते. जर पाऊस येत असेल तर आणखी समस्या उत्पन्न होते. अनेकदा रेल्वे अधिकारी व संसद सदस्यांना याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. परंतु त्यांनी लक्ष न दिल्याने जनतेला समस्या सहन करावी लागत आहे.ड्रामाचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल, अशोक शर्मा, कोषाध्यक्ष जितेंद्र परमार, रेल्वे कमिटी सदस्य मेहबूब हिराणी, चंद्रकांत पांडे, प्रकाश तिडके, प्रमोद सचदेव, विष्णू शर्मा यांनी रेल्वे प्रशासनाला पुन्हा निवेदन दिले आहे. त्यात दोन्ही लोखंडी गेट मार्गावरून हटविण्याची मागणी आहे.